तुम्हाला माहितीये घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही-साखर का खातात?

दही आणि साखर एकत्र खाण्याचे फायदे जाणून घ्या.

Updated: May 27, 2022, 10:04 PM IST
तुम्हाला माहितीये घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही-साखर का खातात? title=

मुंबई : तुम्ही पाहिलं असेल की घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही साखरेने तोंड गोड करणे ही वर्षानुवर्षे पाळलेली एक पद्धत आहे. आतापर्यंत तुम्ही यामागचे कारण ऐकले असेलच की असे केल्याने कामात यश मिळते, काही ही अशुभ किंवा अप्रिय घडत नाही. पण हे कितपत खरे आहे याचा पुरावा नाही. 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय संस्कृतीच्या या प्रथेला वैज्ञानिक आधार आहे. घरातील वृद्धांना याचे नेमके कारण माहित नसले तरी त्याचे सेवन फायदेशीर आहे हे मात्र खरे.

वास्तविक दही हा परिपूर्ण आहार म्हटला जातो. कारण दह्यासोबत खाल्लेले कोणतेही अन्न सहज पचते. त्याच वेळी, साखर शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते. अशा वेळी जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळून सेवन कराल तर फायदा दुप्पट होतो. हे मिश्रण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, हे मिश्रण आयुर्वेदात सकाळी खाण्याची शिफारस केली जाते.

दही खाल्याने त्यामधून पाणी, प्रथिने, चरबी, खनिजे, कर्बोदके, कॅल्शियम, लोखंड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, साखरेतील पोषक, कॅलरीज, ग्लुकोज

दही साखर खाण्याचे फायदे

प्रतिकारशक्ती वाढवते
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनच्या समस्येवर फायदेशीर
पचन सुधारणे
हृदयविकाराची शक्यता कमी
आतडे निरोगी ठेवते
मानसिक आरोग्यासाठी आवश्यक

आयुर्वेदात दही साखरेचे महत्त्व

आयुर्वेदानुसार, दही त्याच्या स्वभावामुळे 'कफ-वर्धक' म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात शरीर थंड आणि शांत ठेवण्यासाठी ते साखर मिसळून खाण्याचा सल्ला दिला जातो. हे मिश्रण शरीरातील तणाव आणि थकवा कमी करण्यास देखील मदत करते, याचे एकत्र सेवन केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील सुधारते.