चहा-कॉफीनंतर पाणी पितात का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या

अहवालानुसार, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. पण...

Updated: Jun 14, 2022, 06:38 PM IST
चहा-कॉफीनंतर पाणी पितात का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या title=

मुंबई : चहा किंवा कॉफी आपल्यापैकी बरेच लोक पितात. चहा किंवा कॉफी पिणारा वेगवेगळा वर्ग आहे. काही लोक चहा चवीसाठी पितात, तर काही लोकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. याचे सेवन केल्याने लोकांना ताजेतवाने वाटते. परंतु तुम्हाला यासंदर्भात काही गोष्टी माहितीयत का? तुम्ही अनेकदा लोकांना हे बोलताना ऐकलं असेल की, चहावर किंवा कॉफीवर पाणी पिऊ नये, पण हे असं का सांगितलं जातं? यामागचं कारण बऱ्याच लोकांना माहित नसतं, तर काही लोक म्हणतात की यामुळे दात खराब होतात. परंतु ही गोष्ट किती खरी आहे? किंवा या शिवाय याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हे जाणून घ्या. 

तर आज आम्ही तुम्हाला हेच समजून घेण्यासाठी मदत करणार आहोत. या विषयावरील द हेल्थ साइटच्या अहवालात असे म्हटले आहे की, असे केल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊ या.

अहवालानुसार, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. जेणेकरुन असे करणे कितपत धोकादायक आहे हे सिद्ध करता येईल आणि व्यक्तीला सतर्कता ठेवता येईल. पण दिसलेले काही बदल त्या आधारे लोकांना सावध करतात.

चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने पायोरियाचा धोका वाढतो. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या असू शकतात. जसे अॅसिडीटी आणि पोटदुखी.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा अॅसिडिटीचा त्रास होत असेल, तर हे टाळण्यासाठी चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्यावे असे सांगितले जाते. कारण यानंतर जर तुम्ही पाणी प्यायलात, तर तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास जास्त उद्भवू शकतो.

एका अहवालानुसार, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर जळजळ होते कारण ते दोन्ही आम्लयुक्त असतात. कॉफीचे पीएच मूल्य 5 आणि चहाचे पीएच मूल्य 6 आहे. त्याच वेळी, पाण्याचे पीएच मूल्य 7 आहे, ज्याला तटस्थ म्हणतात. त्यामुळे चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहे.

तज्ज्ञांनी कॉफी किंवा चहा घेण्यापूर्वी पाणी पिण्याचे आणखी एक फायदे सांगितले आहेत. ते म्हणतात की चहा आणि कॉफीमुळे आतड्यांच्या अस्तरावर अल्सर होऊ शकतो. त्यामुळे ते पिण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पोटात अल्सर होण्याचा धोकाही कमी होतो.

ज्यामुळे चहा, कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्या, पण याचे सेवन केल्यानंतर मात्र पाणी पिऊ नये.