सावधान! तुम्हाला देखील बोट मोडण्याची सवय आहे? ही सवय भलतीच महागात पडू शकते

तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल की, हाताची बोटं मोडणं ही एक वाईट सवय आहे.

Updated: Mar 16, 2022, 09:05 PM IST
सावधान! तुम्हाला देखील बोट मोडण्याची सवय आहे? ही सवय भलतीच महागात पडू शकते title=

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणती ना कोणती सवय असते. सवय ही चांगली किंवा वाईट दोन्ही ही असू शकते. परंतु त्यापासून लांब जाणं किंवा ती सवय सोडणं लोकांना सहजासहजी शक्य नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका सवयीबद्दल सांगणार आहोत. जी आपल्यापैकी बरेच जण करताता. ती आहे हाताची बोट मोडण्याची. तसे पाहाता हाताची बोटं मोडणं ही वाईट आहे किंवा याचा आपल्यावर आरोग्यावर कोणताही परिणाम होईल, असा विचार आपल्यापैकी कोणीही केला नसावा. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल की, हाताची बोटं मोडणं ही एक वाईट सवय आहे, ज्याचा परिणाम आपल्या हाडांवर होऊ शकतो आणि आपली हाडं कमकूवत करु शकतो.

डॉक्टरांच्या मते, जर आपण आपल्या हातांची किंवा पायांची बोटं मोडली, तर त्याचा आपल्या हाडांवर वाईट परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम आपल्या कार्य करण्याच्या क्षमतेवरही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हालाही जर अशी सवय असेल, तर ताबडतोब तुमची ही सवय सोडा.

आपल्या शरीरातात अनेक जॉइंट्स असतात, या जॉइंट्समध्ये एक प्रकारचे लिक्विड असते. जे आपल्या शरीराची हाडे जोडण्यास आपल्याला मदत करते. या लिक्विडचे नाव synovial fluid आहे.
synovial fluid आपल्या शरीरात ग्रीसचे काम करते. याचा अर्थ असा की, हा लिक्विड हाडे एकमेकांसोबत घासण्यापासून रोखतो. synovial fluid मध्ये उपस्थित असलेल्या वायूमधून कार्बन डाय ऑक्साईड एक नवीन जागा तयार करते. ज्यामुळे फुगे बनतात. जेव्हा आपण हाडे फोडतो तेव्हा हे फुगे फुटतात. ज्यामुळे आपल्या बोटांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बोटांना मोडल्याने संधिवात होते. अहवालानुसार, आपली हाडे एकमेकांना जोडले असतात. त्यामुळे आपण वारंवार आपली बोटं मोडल्याने, आपल्या शरीरामधील synovial fluid कमी होते. जर आपण हे सारखे सारखे केले, तर आपल्याला आयुष्यभर संधिवाताचा त्रास सहन करावा लागू शकतो.

एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जास्त बोटाने मोडल्याने आपल्या हाताला सूज येते. तसेच, आपल्या सॉफ्ट टिश्यूजमध्ये देखील सूज येऊ शकते. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जर आपण सारखे सारखे बोटं मोडली तर, कालांतराने आपली बोटं काम करणे थांबवू शकतात.