मुंबई : देशात कोरोना व्हायरसची प्रकरणं कमी होत असल्याचं दिसून येतंय. मात्र अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेकडून एक चिंतेत भर घालणारी आली. यामध्ये WHOला इतक्या दिवसांपासून जी भीती होती ती खरी झाली आहे. डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा व्हेरिएंट येणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकून सांगण्यात आलं होतं.
डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा एक व्हेरिएंट आहे, ज्यामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन हे दोन्ही व्हेरिएंट एकत्र आहेत. म्हणून याला रीकॉम्बिनंट व्हायरस म्हणून ओळखलं जातंय.
वॉवरिक युनिवर्सिटीचे वायरोलॉजीस्ट प्रोफेसर लॉरेंस यंग यांच्या सांगण्यानुसार, रीकॉम्बिनंट व्हायरस तेव्हा समोर येता जेव्हा व्हायरसचे एकापेक्षा अधिक व्हेरिएंट एखाद्या व्यक्तीला संक्रमित करतात. डेल्टाक्रॉन हा एकाच लोकसंख्येत पसरलेला डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही प्रकारांचं मिश्रण आहे.
GISAID चं म्हणणं आहे की, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची माहिती फ्रान्समध्ये मिळाली. या वर्षाच्या सुरुवातीलाच हा व्हेरिएंट पसरत असल्याची माहिती आहे. तर डेन्मार्क आणि नेदरलँड्समध्येही समान प्रोफाइल असलेले जीनोम ओळखले गेलेत.
आतापर्यंत या व्हेरिएंटची काहीच प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे या व्हेरिएंटची गंभीरता किती आहे, हे सांगण्यासाठी पुरेसा डेटा उपलब्ध नाहीये.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हा व्हेरिएंट असामान्य नाहीये आणि अशा प्रकारच्या व्हेरिएंटमध्ये डेल्टाक्रॉन हा पहिला व्हेरिएंट नाहीये किंवा शेवटचाही नाही. डॉ. जेफरी बफेट यांच्या म्हणण्याप्रमाणे, जेव्हा एक डॉमिनंट व्हेरिएंट दुसऱ्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळी असं होण्याची शक्यता आहे.