रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात हवेत हे '5' पदार्थ

तणावग्रस्त जीवनशैली आणि संतुलित, पोषक आहाराचा अभाव यामुळे लाईफस्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावला आहे. 

Updated: Jul 29, 2018, 05:31 PM IST
रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात हवेत हे '5' पदार्थ title=

मुंबई : तणावग्रस्त जीवनशैली आणि संतुलित, पोषक आहाराचा अभाव यामुळे लाईफस्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावला आहे. अशापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास त्याचा परिणाम हृद्यावर आणि मेंदूवर होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबामुळे हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. म्हणूनच औषधोपचारांसोबत आहारात काही योग्य घटकांचा समावेश केल्यास त्रास  कमी होण्यास मदत होते.  

उच्च रक्तदाबाच्या आहारात कोणते पदार्थ असावेत ? 

केळ - 

केळ हे बारमाही फळ  बाजारात सहज उपलब्ध होते. केळ्यात पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात असतात. सकाळी दूधासोबत पूर्ण पिकलेले गोड केळं खाल्ल्यास रक्तदाबासोबतच अनेक आजार नियंत्रणात राहण्यास मदत होते. केळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे

पालक -

पालकमध्ये फायबरसोबतच मॅग्नेशियम, पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. 

लसूण -

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लसणाचा वापर हमखास केला जातो. प्रामुख्याने रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी आहारात लसणाचा वापर केलाच पाहिजे. यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते.  

ओटमील - 

ओटमील्समुळे रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. यामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. सोडियम कमी प्रमाणात असल्याने ओटमीलच्या सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहतो.  

बीट -

बीटाच्या सेवनामुळे रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामधील नायट्रेट  घटक रक्तवाहिन्यांचे आरोग्य जपण्यास मदत करते. जेवणासोबत रोज सलाड, फ्रेश ज्यूसच्या स्वरूपात बीटाचा आहारात समावेश केल्यास यामुळे रक्तदाब नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते.