मुंबई : व्यायाम आणि आहार निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण अनेकदा धावपळीच्या जीवनशैलीत व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तर आहाराकडे नीटसे लक्ष दिले जात नाही. या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. इतकंच नाही तर आहारातील चुकीच्या सवयींमुळे हाडांचेही नुकसान होते. कोणत्या आहेत त्या सवयी ज्या हाडांच्या आरोग्यास घातक ठरतात?
खूप जास्त मीठ खाल्याने शरीरात कॅल्शियमचे erosion होते. त्यामुळे हाडे कमजोर होतात.
वाढत्या वयात सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय असल्यास हाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सोड्यातील फॉस्फोरस, कॅल्शियमच्या वापरात अडथळा आणतात. अधिक प्रमाणात सोड्याचे सेवनामुळे हाडांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते.
दिवसातून ३-४ कपापेक्षा अधिक कॉफी पिण्याची सवय हाडांच्या आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे कॉफीचे सेवन कमी करुन आहारात कॅल्शियम युक्त आहाराचा समावेश करा.
साखरयुक्त पदार्थ खाणे कमी करा. त्याऐवजी फळे, भाज्या खाणे फायदेशीर ठरेल.
चॉकलेटमध्ये असलेल्या ऑक्सलेट (oxalate) मुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण कमी होते. त्यामुळे कितीही आवडत असले तरी चॉकलेटही प्रमाणातच खा.
अल्कोहोल सेवनाने शरीरात कॅल्शियम कमी प्रमाणात शोषले जाते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो.