आता डास नाही पसरवू शकत डेंगी, झिकाचा धोका

वातावारणामध्ये बदल झाल्यानंतर आजारपण येणं सहाजिक असतं.तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इंफेक्शनचा धोका बळावतो. 

Updated: Jul 11, 2018, 05:34 PM IST
आता डास नाही पसरवू शकत डेंगी, झिकाचा धोका   title=

मुंबई : वातावारणामध्ये बदल झाल्यानंतर आजारपण येणं सहाजिक असतं.तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इंफेक्शनचा धोका बळावतो. पावसाळ्यात पाणी साचल्याने डेंग्यू,  मलेरिया, चिकनगुनियाची साथ पसरते. या  आजरावर वेळीच उपचार  न मिळाल्यास ते जीवघेणं ठरू शकतं. मात्र  ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या एका प्रयोगामध्ये डेंग्यूच्या 80% डासांचा नाश करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे.  या '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !

ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांचा दावा -  

ऑस्ट्रेलियामधील जेम्स कूक युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेत न चावणार्‍या एडिस एजिप्टी या नर प्रजातीतील डासाची उत्पत्ती करण्यात आली. 

गूगलची मूळ कंपनी अल्फाबेटने या डासांना वोलबाचिया विषाणुने संक्रमित केले. यामुळे ते जीवाणूहीन बनले. त्यानंतर क्विन्सलॅन्ड शहरामध्ये जंगलात परिक्षणासाठी त्यांना सोडण्यात आले. या नर डासांना मादींसोबत ठेवण्यात आलं. या डासांनी घातलेल्या अंड्यामधून डासांची निर्मिती झाली नाही. त्यामुळे त्यांच्या संख्येमध्ये घट  झाली.  

एडीस एजिप्टी या डासामुळे जगभरात डेंगी, झिका, चिकनगुनिया यासरख्या जीवघेण्या आजाराची साथ पसरते.  डासांना पळवून लावतील हे घरगुती उपाय!