डोकेदुखी कमी करतील घरातील हे '5' पदार्थ

आजकाल तणावग्रस्त आयुष्यामुळे असो किंवा वातावरणात बदल झाल्यानंतर सर्दी, खोकला आणि यामधून डोकेदुखीचा त्रास बळावतो. अनेक लोकांना तणावग्रस्त जीवनशैलीतून मायग्रेनचा त्रासही जाणवतो. झोप पूर्ण झाली नसेल तरीही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मग अशा कारणांमधून उद्भवणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी आयुर्वेदातील काही उपाय फायदेशीर ठरतात. एका मिनिटांत दूर होईल डोकेदुखी

Updated: Jul 11, 2018, 04:50 PM IST
डोकेदुखी कमी करतील घरातील हे '5' पदार्थ  title=

मुंबई : आजकाल तणावग्रस्त आयुष्यामुळे असो किंवा वातावरणात बदल झाल्यानंतर सर्दी, खोकला आणि यामधून डोकेदुखीचा त्रास बळावतो. अनेक लोकांना तणावग्रस्त जीवनशैलीतून मायग्रेनचा त्रासही जाणवतो. झोप पूर्ण झाली नसेल तरीही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मग अशा कारणांमधून उद्भवणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी आयुर्वेदातील काही उपाय फायदेशीर ठरतात. एका मिनिटांत दूर होईल डोकेदुखी

आलं -  

डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आलं फायदेशीर आहे. पाण्यामध्ये आल्याचा टाकून उकळा. या पाण्याची वाफ घेतल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. या लोकांंनी 'आलं' खाणं ठरू शकतं घातक

लिंबाचा रस - 

डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी समप्रमाणात आल्याच्या रसासोबत लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण दिवसातून 1 किंवा 2 वेळेस प्यायल्यास डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

पुदीना - 

डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी पुदीन्याच्या पानांचा रस डोक्यावर लावा. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होते. 

आईसपॅक -

मायग्रेनचा त्रास जाणवत असल्यास पाठीवर आईसपॅकने मसाज करावा. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते.  

लवंग - 

लवंगाला बारीक वाटून एका कापडामध्ये ठेवा. थोड्या थोड्या वेळाने हे सुंगत रहावे. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. रोज एक लवंग खा आणि 'या' समस्या दूर करा! 

सफरचंद - 

डोकेदुखीच्या त्रासामध्ये सफरचंद फायदेशीर ठरते. डोकेदुखी जाणवत असल्यास सफरचंदाच्या फोडीला मीठ लावून खाणं फायदेशीर ठरतं. सफरचंद खाण्याचे 5 फायदे