कढीपत्त्या मागे दडलंय सौंदर्याचं रहस्य

सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. त्यावर भरपूर खर्चही करतो.

Updated: Jun 4, 2019, 01:35 PM IST
कढीपत्त्या मागे दडलंय सौंदर्याचं रहस्य title=

मुंबई : सुंदर दिसण्यासाठी आपण काय काय नाही करत. सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. त्यावर भरपूर खर्चही करतो. मात्र त्याचे तितकेसे परिणाम दिसत नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का? सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच दडलं आहे. त्या रहस्याचं नाव आहे... 'कढीपत्ता'. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन 'सी', व्हिटॅमिन 'बी' आणि व्हिटॅमिन 'ई' असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. विविध स्तरावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कढीपत्ता हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच, पण कढीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस आणि त्वचाही चांगली होती.

- कढीपत्त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास सौंदर्यात भर पडते. कढीपत्त्याच्या वापराने मुरुमं तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

- कढीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही पाने वाटून त्यांची पेस्ट बनवा. कोरड्या त्वचेसाठी ही पेस्ट चांगली आहे. यामुळे चेहऱ्याला चमकही येते.

- या पेस्टने बॉडीला मसाज केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात, तसेच जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर, कढीपत्त्याच्या पानांची पावडर करुन नियमित ३ ते ४ ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी त्याचे सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.  

- कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार दही घाला. तयार मिश्रण केसांना लावल्यानंतर तुम्हाला एकदम थंड वाटेल. हे मिश्रण २० ते ३० मिनिटे ठेवून केस स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हे मिश्रण केसांना लावा.