कोरोना लस ZyCov-D भारतातील 7 राज्यांमध्ये होणार लाँच

कंपनी या महिन्यापासून या ऑर्डरचा पुरवठा सुरू करणार आहे. 

Updated: Dec 3, 2021, 11:20 AM IST
कोरोना लस ZyCov-D भारतातील 7 राज्यांमध्ये होणार लाँच title=

मुंबई : देशातील लहान मुलांसाठी कोरोनाची लस लवकरच येणार आहे. सरकारने Zydus Cadila या औषध कंपनीला 1 कोटी डोस ऑर्डर केले होते. कंपनी या महिन्यापासून या ऑर्डरचा पुरवठा सुरू करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही लस महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह 7 राज्यांतील मुलांना दिली जाणार आहे.

ZyCov-D ही तीन डोसची लस आहे. सरकारने या लसीसाठी 265 रुपये प्रति डोस अशा हिशोबाने ऑर्डर दिली आहे. म्हणजेच 3 डोसची किंमत 795 रुपये असेल.

दरम्यान नीडर-फ्री टेकनिकसाठी 93 प्रति डोस स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाईल. यामध्येही जीएसटीचा समावेश नाही. अशाप्रकारे, सरकारसाठी तीन डोसची किंमत 1,074 रुपये असेल.

नुकतंच, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने(CDSCO) 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत ही लस वापरण्यास मान्यता दिली. ZyCov-D ची निर्मिती Zydus Cadila या भारतीय कंपनीने केली आहे. हे मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत सरकारच्या बायोटेक्नॉलजी विभागाच्या भागीदारीत विकसित केलं गेलं आहे.

कसं काम करते ही लस

अलीकडेच, सेंट्रल ड्रग्ज S Zydus Cadila ची ही कोरोना लस जगातील पहिली DNA लस आहे. याद्वारे, जेनेटिकली इंजीनियर्ड प्लास्मिड्स शरीरात इंजेक्ट केले जातात. यामुळे शरीरात COVID-19 चे स्पाइक प्रोटीन तयार होतं आणि त्यामुळे व्हायरसपासून संरक्षण करणारे अँटीबॉडीज तयार होतात. बहुतेक कोरोना लस 2 डोसची आहे, परंतु कॅडिलाची ही लस 3 डोस घेईल.

या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ती सुईने टोचली जाणार नाही. हे एका विशेष उपकरणाद्वारे ही लस देण्यात येणारे. या पद्धतीमुळे लसीकरणामुळे वेदना होणार नाहीत, असा दावा झायडस कॅडिलाने केला आहे. कंपनीचा दावा आहे की, या लसीचे कमी दुष्परिणाम आहेत.