कोरोना संसर्गाने अशक्त झाला आहात का?, या टीप्स वापरुन लवकर बरे व्हाल !

भारतात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची (Corona Cases In India)संख्या देशभर झपाट्याने वाढत आहेत. आजकाल प्रत्येक तिसरी व्यक्ती कोरोना संक्रमित (Coronavirus) होत आहे.  

Updated: May 3, 2021, 02:29 PM IST
कोरोना संसर्गाने अशक्त झाला आहात का?, या टीप्स वापरुन लवकर बरे व्हाल ! title=

 मुंबई : भारतात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची (Corona Cases In India)संख्या देशभर झपाट्याने वाढत आहेत. आजकाल प्रत्येक तिसरी व्यक्ती कोरोना संक्रमित (Coronavirus) होत आहे.  कोरोनाव्हायरस दरम्यान आणि त्यानंतर काही दिवसांपर्यंत त्या व्यक्तीला खूप अशक्तपणा आणि आजारी वाटते. काही लोकांमध्ये, कोविडची (Covid-19 Symptoms) लक्षणे कित्येक महिने देखील राहतात. कोविड -19च्या संसर्गानंतर (Post Covid Recovery)  स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोना संसर्गानंतर अनेक महिने त्रास

कोरोनाव्हायरस  (Coronavirus) थेट व्यक्तीच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे  विशेषतः उच्च रक्तदाब (Hypertension)आणि मधुमेह Diabetes) असलेल्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या प्रतिकारशक्तीनुसार (Immunity) या संसर्गापासून मुक्त होऊ शकतो. सहसा कोरोना संसर्गाची (Covid 19 Symptoms) हळूवार लक्षणे असलेले रुग्ण 14 दिवसात बरे होतात. परंतु निगेटिव्ह रिपोर्ट असूनही, काही लोकांना दीर्घकाळापर्यंत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. यातून सावरण्यास 6-8 महिने लागू शकतात.

कोविडनंतर Recoveryसाठी घ्या काळजी  

कोरोना संसर्गानंतर लवकर  Recovery आणि दैनंदीन काम करण्यासाठी आपल्या पोषण (Nutrition), तंदुरुस्ती  (Fitness) आणि आरोग्यावर  (Health) विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जर आपल्याला कोरोना संसर्ग झाला असेल तर काळजी घ्या. 1 दिवस किंवा 14 दिवसांच्या दरम्यान आपण विशेष याची काळजी घ्या. कोविड -19  नंतर (Post Covid Recovery Tips) लवकर बरे होण्यासाठी या काही महत्वाच्या टीप्स आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

सकाळी लवकर उठणे महत्वाचे 

दररोज सकाळी लवकर जागे होणे आपल्याला ताजेतवान आणि सकारात्मक वाटेल. सकाळी ताजी हवा आणि सूर्यप्रकाश शरीरासाठी चांगले असते. तसेच आपली ऊर्जा सक्रिय ठेवण्यास मदत होते. कोविडचा अहवाल निगेटिव्ह झाल्यावर, हलका व्यायाम सुरु करा. हे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त करेल.

सुरुवातीला सोपे व्यायाम करा

कोरोनामधून बरे होण्याची प्रक्रिया अवघड आहे. म्हणून त्यामध्ये घाई करू नका. सुरुवातीच्या दिवसांमध्ये वजन जास्त उलण्याचा  (Heavy Weight Exercise) व्यायाम करण्याऐवजी हलका- कमी वजनाचा व्यायाम करा. हळू चालत रहा, श्वास घेण्याच्या व्यायामाकडे (Breathing Exercise) आणि ध्यानकडे लक्ष द्या. शरीरावर अति थकवा आणणारा ताण टाळा.

योगावर भर देऊन राहा निरोगी

घरी असताना आपल्या ऑक्सिजनची पातळी नियंत्रित (Oxygen Level Normal) ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी आपण अनुलोम-विलोम, कपालभाति, प्राणायाम इत्यादी करु शकता. दररोज सूर्य नमस्कार करण्याची सवय लावा.

ड्राय फ्रूट्स तुमचे आरोग्य सुधारेल

दररोज खजूर, मनुका, बदाम, काजू आणि अक्रोड यासारखे ड्राय फ्रूट्स  नक्कीच खा. ड्राय फ्रूट्स रात्रभर पाण्यात भिजवा आणि त्यानंतरच सकाळी त्यांचे सेवन करा. यामुळे शरीर आतून बळकट होईल.

खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या

कोविडमधून  (Post Covid Diet) बरे झाल्यानंतर, आपल्या हाडांच्या मजबुतीकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणून तुमची न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची काळजी घ्या. आहारात सूप, मसूर यासारख्या गोष्टींचा समावेश करा. कॅल्शियम आणि फॉस्फरस असलेल्या पदार्थ खा.

कोविड -19मधून बरे झाल्यानंतर आपल्याला 6-8 महिने कोणत्याही प्रकारची समस्या वाटत असल्यास, कृपया विलंब न करता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.