उन्हाळ्यात जांभूळ आरोग्यासाठी लाभदायक

जांभूळ फळाचे शास्त्रीय नाव 'सायझिजियम क्युमिनी' असे आहे.  

Updated: May 2, 2021, 09:43 PM IST
उन्हाळ्यात जांभूळ आरोग्यासाठी लाभदायक  title=

मुंबई : आकाराने लहान असला तरी जांभूळ फळाचे अनेक फायदे आहेत. मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढणाऱ्या जांभूळ फळाचे शास्त्रीय नाव 'सायझिजियम क्युमिनी' असे आहे. जांळामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्व असतात. सुगंधी पाने आणि गुणकारी बीज, फळे, फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधने तयार केला जात असे. 

मधुमेहावर नियंत्रण : जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा आणि दिवसातून तीनवेळा खा. मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील. हा उपाय पारंपरिक असून अतिशय परिणामकारक आहे.

रक्तदाबाचा त्रास कमी होतो : मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४.६ टक्क्यांनी कमी होतो.

 पोटांच्या विकारांवर उपयुक्त : पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते. बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर  इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर आहे. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून २-३ वेळा घ्या.