मुंबई : तुमच्या शरीरात जर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर तुम्हाला तुमच्या आहारावर लक्ष देण्याची गरज आहे. कारण खाण्यापिण्याच्या काही रोजच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. तसेच उच्च कोलेस्ट्रॉलमुळे स्ट्रोकचा धोकाही वाढतो. त्यामुळे
कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी कशी कमी करावी तसेच कसा आहार घ्यावा असे तुम्हाला वाटत असेल तर खालील सवयी आताच करून घ्या.
'या' गोष्टी टाळा
चरबीयुक्त मांस
मांस हा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा चांगला स्रोत मानला जातो. परंतु काही पदार्थांमध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट घेतल्याने कोलेस्टेरॉलच्या पातळीवर परिणाम होतो.
गोड कमी खा
गोड आणि साखरेचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्टेरॉलही कमी होते आणि वाईट कोलेस्टेरॉल वाढते. साखर घालण्याऐवजी गोड फळे खावीत.
'या' गोष्टी खाव्यात
फायबरयुक्त अन्न
आहारातील सॅच्युरेटेड फॅट कमी करा आणि फायबरयुक्त पदार्थ खा, यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल. तुमचे वजन वारंवार वाढत असेल आणि कमी होत असेल तर त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याचा धोका वाढतो.
'या' गोष्टींचा आहारात समावेश करा
तुमच्या आहारात ओट्स, बार्ली, सफरचंद, बीन्स, फ्लेक्स बिया आणि चिया बियांचा समावेश करा. पुरेशा प्रमाणात विरघळणारे फायबर घ्या, यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
हिरव्या भाज्या खा
आहारात भरपूर भाज्यांचा समावेश न केल्यानेही तुमचे नुकसान होते. ब्रोकोली आणि फुलकोबीसारख्या क्रूसिफेरस भाज्यांचा आहारात समावेश करा. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे उपाय करण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)