मुंबई : कोलेस्ट्रॉल वाढणं ही अशीच एक समस्या आहे ज्यासाठी खराब आहार जबाबदार आहे. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, वाईट कोलेस्ट्रॉल आणि चांगलं कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. खराब कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे मेंदूपासून ते डोळे, किडनी आणि हृदयापर्यंत समस्या सुरू होतात.
कोलेस्ट्रॉलच्या वाढीमुळे हृदयविकाराच्या समस्या अनेक पटींनी वाढतायत, त्यामुळे ते नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. बडीशेपचं सेवन कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरतं. बडीशेप पाण्यात उकळून प्यायल्यास कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करता येतं. चला जाणून घेऊया बडीशेपचं पाणी कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रित करतं.
बडीशेप हा असा मसाल्यातील पदार्थ आहे की ज्याचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करता येतं. फायबरने युक्त बडीशेप पाण्यात उकळून सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. बडीशेप खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. 1 कप बडीशेपमध्ये 3 ग्रॅम फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.
अनेक संशोधनांमध्ये असं समोर आलंय की, एका दिवसात 7 ग्रॅम फायबरचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका 7 टक्क्यांनी कमी होतो. बडीशेप आणि त्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.