Lack Of Sleep: आपल्या प्रत्येकाच्या शरीरासाठी झोप ही प्रचंड आवश्यक आहे. झोप शरीराला आराम देते आणि पुन्हा काम करण्यास तयार करते. सतत काम केल्यामुळे आपल्या यंत्राप्रमाणे असलेल्या शरीरालाही इजा होऊ शकते. झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेह, हृदयविकार, खराब चयापचय आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.
तज्ञांच्या मते, दररोज 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. झोप चांगली असेल तर आरोग्यही चांगलं राहतं. झोपेच्या कमतरतेमुळे, शरीर सक्रियपणे कार्य करण्यास सक्षम नाही, सर्व वेळ आळस असतो. जर झोप पूर्ण झाली नाही, तर थकव्यामुळे, तुम्ही कोणतेही अतिरिक्त काम करू शकत नाही किंवा योग किंवा व्यायामासारख्या सवयी लावू शकत नाही.
इतकंच नाही तर कमी झोपेमुळे शरीर आळशी होतं, त्यामुळे वजन वाढण्याची समस्याही भेडसावू शकते. वजन कमी करायचं असेल तर पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.
झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोनचं प्रमाण वाढू लागतं. कार्टिसॉल कुशिंग सिंड्रोमसाठी जबाबदार आहे. कोर्टिसोलचं प्रमाण जास्त असल्याने चेहरा, छाती आणि पोटाची चरबी झपाट्याने वाढते. झोपेची कमतरता हे कार्टीसोलच्या अत्यधिक स्रावाचं कारण आहे.
वजन नियंत्रणात ठेवायच असेल तर चांगली झोप घ्यावी लागेल. चांगल्या झोपेसाठी सकस आहार आवश्यक आहे, आहारात ड्रायफ्रुट्स, नट्स आणि दूध यासारख्या गोष्टींचा समावेश करा. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनजवळ जास्त वेळ घालवू नका.
तरीही झोप येत नसेल तर रोज योगा किंवा व्यायाम करायला सुरुवात करा. तणावापासून दूर राहा, सकाळी लवकर उठणं आणि मन:शांतीसाठी दररोज योग किंवा ध्यान करणं फायदेशीर ठरेल.