तुम्हाला पांढरी मिरी माहित आहे का? ही काळी मिरीपेक्षा जास्त फायदेशीर

आयुर्वेदात पांढरी मिरी एक औषधी वनस्पती मानली जाते. 

Updated: Jul 22, 2021, 10:09 PM IST
तुम्हाला पांढरी मिरी माहित आहे का? ही काळी मिरीपेक्षा जास्त फायदेशीर title=

मुंबई : तुम्हाला पांढरी मिरी माहित असेल, ही शक्यतो चवीसाठी आणि गरम मसाल्यात वापरली जाणारा पदार्थ आहे. परंतु ही फक्त आपल्या स्वयंपाकघरात अन्नाची चव वाढविण्यासाठी मदत करत नाही तर, ती आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. काही लोकं याला दख्खनी मिरची या नावाने देखील ओळखतात. ज्यांचे चमत्कारीक गुणधर्म डोळ्यांसाठी  रामबाण उपाय म्हणून काम करतात. यासह, पांढरी मिरी आपल्या शरीराच्या अनेक सामान्य आजारांपासून ते कर्क रोगापर्यंतच्या गंभीर आजारांपासून आपल्याला मदत करते. तर या पांढरी मिरीचे फायदे काय आहेत ते जाणून घ्या.

आयुर्वेदात पांढरी मिरी एक औषधी वनस्पती मानली जाते. त्यात फ्लेवोनोइ, जीवनसत्त्वे, लोह आणि बरेच पौष्टिक पदार्थ असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. ज्यांना डोळ्यांच्या समस्या जाणवता, त्या लोकांनी या सेवन सुरू केले पाहिजे. मोतीबिंदूसारख्या समस्यांसाठी देखील हे उपयुक्त मानले जाते.

पांढरी मिरी किंवा दख्खनी मिरची खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर पडतात. ज्याचा हृदयाला फायदा होतो. ते सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि हृदयरोग होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते.

पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी देखील पांढरी मिरी कार्य करते. तुम्ही ते स्वयंपाकामध्ये देखील वापरू शकता किंवा कोशिंबीरात त्याची पावडर टाकू शकता. त्याचे नियमित सेवन केल्यास तुमची पाचन शक्ती देखील बळकट होते आणि पोटदुखी, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, अल्सर सारख्या आजारांमध्ये आराम मिळतो.

पांढरी मिरचीचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास देखील मदत होते. त्याचा काढा प्यायल्याने केवळ रोग प्रतिकारशक्तीच वाढत नाही, तर वजनही नियंत्रणात राहते. यात कॅप्साइसिन आहे जे, चरबी बर्न करण्यात मदत करते.

एका अभ्यासानुसार, कॅप्साइसिन सामग्री शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते. प्रोस्टेट कर्करोग बरा करण्यासाठी ही पांढरी मिरी प्रभावी आहे. जीवनसत्त्वे, लोह, अँटी-ऑक्सिडेंट इत्यादी पौष्टिक पदार्थ त्यात आढळतात. म्हणून, दररोज त्याचे सेवन केल्यास ते शरीरात कर्करोगाच्या पेशींच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवते.

दख्खनी मिरची किंवा पांढरी मिरीमध्ये असलेले पोषक तत्वे शारीरिक वेदना कमी करतात. हे शरीरात होणार्या वेदनांपासून आराम देतात आणि दररोज हे सेवन केल्याने स्नायूंमध्ये सूज आणि सांधेदुखी कमी होते.