मुंबई : अनेक लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर चालायला जायला आवडते, असे मानले जाते की असे केल्याने जेवणाचे पचन होते, तसेच यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. परंतु जेवल्यानंतर चालण्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते. चला तर मग आपण जेवल्यानंतर चालण्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
जेवणानंतर फेरफटका मारण्याचे 6 फायदे
1. ग्लुकोजची पातळी नियंत्रित होते
जर एखादी व्यक्ती अन्न खाल्ल्यानंतर चालत असेल, तर त्याच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
2. लठ्ठपणा कमी होईल
जे लोक शरीरातील अतिरिक्त चरबी किंवा लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, त्यांनी अन्न खाल्ल्यानंतर अर्धा किंवा तासभर चालले, तर असे केल्याने शरीरातील पोटावरील चरबी कमी होऊ शकते.
3. निद्रानाश पासून आराम
ज्यांना निद्रानाशाची समस्या आहे, त्यांनी जेवल्यानंतर फेरफटका मारला तर झोपेची गुणवत्ता सुधारते आणि निद्रानाशाच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते.
4. मानसिक आरोग्य चांगले राहते
जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने मानसिक आरोग्य राखता येते. हे चयापचय वाढवण्यास देखील मदत करते.
5. पचन व्यवस्थित होईल
जे अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. याशिवाय, संडास देखील साफ होते.
6. ऊर्जा मिळेल
अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळू शकते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)