Sleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...

Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. 

Updated: Dec 27, 2022, 09:24 PM IST
Sleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...  title=
file photo

Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. सकाळी कितीही वेळेवर उठलो तरी दिवसभर दगदगीमुळे आणि कामाच्या व्यापामुळे आपली जीवनशैली अत्यंत (Unhealthy Lifestyle) खराब झाली आहे. त्यामुळे आपल्याला अनेकदा कमी झोप आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागते आहे. अशामुळे आपले आरोग्यही बिघडते. झोप पुर्ण झाली नाही तर आपल्याला आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो त्यामुळे आपला आहे तो दिवस कामामुळे दगदगीचा तर जातोच पण त्याचबरोबर आपली झोप अपुर्ण राहिल्यामुळे आपला दुसरा दिवसही फार खराब जातो. पण तुम्हाला माहितीये का की तुमच्या वयानुसारही तुमच्या झोपेचे गणित हे बदलत असते. सध्या एक रिसर्चमधून समोर आले आहे की एका ठराविक वयानंतर आपली झोपही कमी होण्याच्या शक्यता आहे, असे या संशोधनातून समोर आले आहे. तेव्हा जाणून घेऊया की संशोधन (Research) नक्की काय सांगते. (age and sleep relation what are the cause and remedies of Sleep Deprivation)

असं कळतं की झोपे कमी येण्याच्या तक्रारी या जास्त इंग्लंडमध्ये लोकांना जाणवल्या आहेत. जगातील इतर नागरिकांच्या तुलनेत इंग्लंड देशातील लोकांना सरासरी कमी झोप लागते. असेही समजते की पुरूषांची सरासरी झोप ही 7 तासांची आहे तर ंमहिलांची 7.5 तास. 

कोणत्या वयात झोप कमी होते?

हे संशोधन 63 देशांमध्ये करण्यात आले. ज्यात 8 लाख लोकं सहभागी होते. त्यात असे आढळून आले आहे की 33 वर्षांच्या वयानंतर लोकांची झोप कमी होते तर 53 वर्षानंतर झोप वाढते. यामध्ये मुख्य कारण असे की तरूणवर्गामध्ये जबाबदाऱ्या आणि पालकत्न, कामाचा ताण यांमुळे झोप कमी होते. 

कुठे झालं संशोधन? 

अशी माहिती कळते की पुर्व एंल्गिया विद्यापीठ आणि ल्योन विद्यापाठातील संशोधकांनी झोपेचा आपल्या वयाशी असणारा संबंध अभ्यासातून मांडला आहे. कोणत्या वयोगटातील लोकांना चांगली झोप लागते या विषयावर वैज्ञानिक संशोधनही झालं आहे. नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मध्यम वयातील लोकांना कमी झोपेचा त्रास उद्भवू शकतो.