हे ४ मसाल्याचे पदार्थ पिंपल्स ठरतील गुणकारी!

 आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे किंवा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, सवयी त्याचबरोबर प्रदूषण या सर्वांमुळे पिंपल्सची समस्या उद्भवते.

Updated: Mar 17, 2018, 10:38 AM IST
हे ४ मसाल्याचे पदार्थ पिंपल्स ठरतील गुणकारी! title=
मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे किंवा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, सवयी त्याचबरोबर प्रदूषण या सर्वांमुळे पिंपल्सची समस्या उद्भवते. मग आत्मविश्वास खालावतो, चीडचीड होते. पण आता हे सर्व टाळा आणि घरगुती उपायांनी पिंपल्सवर मात करा.

हळद-मध 

त्वचेचे इंफेक्शन कमी करण्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे. आंबेहळद किंवा कस्तूरी हळद २ चमच्या मधात घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटांनंतर चेहरा धुवा.

जायफळ-मुलतानी माती

जायफळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते वाटून मुलतानी मातीत मिसळा. त्यात थोडे गुलाबजल घालून मिश्रण पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्स कमी होण्याबरोबरच पिंपल्सचे डागही कमी होण्यास मदत होईल.

दालचिनी-मध

दालचिनी गरम असल्याने ती मधासोबत लावणे योग्य ठरेल. दालचिनी पावडर आणि मधाचे मिश्रण पिंपल्सवर गुणकारी ठरते.

लवंग-मुलतानी माती

एक लवंग पाण्यात भिजत घाला. त्यानंतर ते उगाळून त्याची पेस्ट बनवा. त्यात चमचाभर मुलतानी माती मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.