Navratri Fasting : डायबिटिस-कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी उपवासांत करू नका 'या' 6 चुका

Fasting Tips For Diabetes-Cholesterol Patients: 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवसांत मधुमेही आणि कोलेस्ट्रॉल रुग्णांनी उपवासादरम्यान 5 चुका टाळा 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 13, 2023, 01:10 PM IST
Navratri Fasting : डायबिटिस-कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी उपवासांत करू नका 'या' 6 चुका title=

Navratri Health : शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी म्हणजे 15 ऑक्टोबरपासून सुरूवात होते. देवी लक्ष्मीची या नऊ दिवसांमध्ये मनोभावे पूजा केली जाते. नऊ दिवसांत अनेकजण उपवास करतात. तर काही जण घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तर काही जण नवव्या दिवशी उपवास करतात. अशावेळी उपवास करताना काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. 

तसेच अनेक डायबिटिस आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास असणारे रुग्ण देखील या दिवसांमध्ये उपवास करतात. त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेची आहे. न्यूट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल शर्माने मधुमेही आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या रुग्णांनी 5 चुका टाळाव्यात, असा सल्ला दिला आहे. 

डॉक्टरांचा सल्ला घ्या

उपवास करण्यापूर्वी डायबिटिस आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण तुमच्या सद्याच्या स्थितीनुसार तुम्ही उपवास करू शकता की नाही हे डॉक्टर सांगतिल. 

योग्य झोप घ्या 

अनेकदा उत्सवांमध्ये आपण पुरेशी झोप घेत नाही. सामान्यांना याचा त्रास बहुदा जाणवणार नाही. पण मधुमेही आणि कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांच्या आरोग्यावर या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो. 

हायड्रेट ठेवा

फक्त या रुग्णांनीच नाही तर प्रत्येकाना दररोजच हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. फक्त उपवासांच्या दिवसांमध्ये याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण शरीरातील पाण्याची पातळी तुमचा थकवा दूर करण्यास मदत करतात. 

प्रोबायोटिक्स पदार्थांचे सेवन करा 

नवरात्रीच्या दिवसांमध्ये उपवास करताना दररोज दह्याचे सेवन करा. तसेच उपवास सोडताना देखी दही खावे. दही तुम्हाला शांत ठेवते तसेच ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास कमी करण्यापासून मदत करतात. 

शुगर फ्री पदार्थांनी उपवास सोडा 

 शुगर फ्री पदार्थ खाऊन उपवास सोडा तसेच तेलकट पदार्थ खाऊ नका या पदार्थांनी तुम्हाला त्रास होऊ शकतो. या नऊ दिवसांमध्ये शुगर वाढणे किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास होणे शरीरासाठी घातक ठरू शकते. अनेकदा दिवसभर पोटात काही नसल्यावर उपवास सोडताना तेलकट किंवा गोड पदार्थ खाल्ल्यास त्रास होईल. 

या गोष्टींची घ्या विशेष काळजी 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डायबिटिस आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या रुग्णांनी आपली औषधे न चुकता घ्यावीत. तसेच कुटुंबियांना आपल्या आजारपणाची आणि औषधांची माहित द्यावी. एवढंच नव्हे तर स्वतःला होणारा त्रास विसरता कामा नये. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(फोटो सौजन्य - iStock)