डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी करा पपईचा वापर

काहींना पपई खायला आवडत नाही. मात्र याच्या वापराने चेहऱ्याची सुंदरता वाढते. पपईच्या सालीमध्ये एक एंझाईम ज्यात पपेन असते. 

Updated: Jun 18, 2018, 05:54 PM IST
डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी करा पपईचा वापर title=

मुंबई : काहींना पपई खायला आवडत नाही. मात्र याच्या वापराने चेहऱ्याची सुंदरता वाढते. पपईच्या सालीमध्ये एक एंझाईम ज्यात पपेन असते. पपेनमुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. तसेच त्वचेचा पोत सुधारतो. पपईमध्ये केवळ पपेन नसते तर व्हिटामिन ए, सी आणि ई असते. यासोबतच मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉलिक अॅसिड असते. जर तुम्ही वेगवेगळी उत्पादने वापरुन झाला असाल तर एकदा पपईचा जरुर वापर करा. 

एक कप पपईच्या गरामध्ये दोन चमचे मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. ३० मिनिटांनी चेहरा गरम पाण्याने धुवा. त्वचा लगेचच नितळ होईल. 

उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर पपई त्यासाठी वरदान आहे. पपईच्या गरामध्ये चिमूटभर हळद, एक चमचा गुलाबजल आणि दही मिसळा. हे मिश्रण काळ्या पडलेल्या त्वचेवर लावा. १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. 

डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी कच्चा पपई आणि काकडी एकत्र स्मॅश करुन घ्या. हे मिश्रण काळ्या वर्तुळांवर लावा. १० मिनिटांनी आपल्या बोटांनी रगडून साफ करा. हे दररोज केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होईल.