Made In Heaven मध्ये माझं काम श्रेय न देता चोरलं म्हणणाऱ्या लेखिकेला झोया अख्तरचं सडेतोड उत्तर...

Made in Heaven Radhika Apte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे राधिका आपटेच्या 'मेड इन हेवन' या सिरिजची. यावेळी एका लेखिकेनं मेड इन हेवनच्या मेकर्सवर आरोप केले आहेत. तिचे काम चोरल्याचे हे आरोप होते. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता त्यावर झोया अख्तरनं उत्तर दिलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 18, 2023, 11:33 AM IST
Made In Heaven मध्ये माझं काम श्रेय न देता चोरलं म्हणणाऱ्या लेखिकेला झोया अख्तरचं सडेतोड उत्तर... title=
August 18, 2023 | zoya akhtar denies the allegations made by yashita dutt as she claims that her work and idenity has been stolen in made in heaven 2

Made in Heaven S2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'मेड इन हेवन'च्या S2 ची. या सिझनमध्ये राधिका आपटेनं बौद्ध पद्धतीनं केलेल्या लग्नाची चर्चा रंगलेली आहे. सध्या तिचा हा विवाह फारच चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपुर्वी लोकप्रिय लेखिका याशिका दत्त हिनं आपलं काम या सिरिजमधून चोरण्यात आल्याचा आरोप लावला होता. त्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा रंगलेली होती. आता यावर लेखिका आणि दिग्दर्शिका झोया अख्तर हीनं आक्षेप घेतला असून यावेळी तिनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. दलित लेखिका याशिका दत्त हिनं यावेळी केलेले आरोप झोया अख्तर हिनं आणि तिच्या संपुर्ण टीमनं फेटाळले आहेत. झोया अख्तर, रीमा कगती, अल्क्रिंता श्रीवास्तव, नीरज घायवान यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 2019 साली Made in Heaven ही वेबसिरिज पहिल्यांदा प्रदर्शित झाली होती. त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आलेला दिसला आहे. त्यानंतर आता चार वर्षांनी या सिरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. 

यावेळी लेखिका याशिका दत्त हिनं म्हटले होते की, राधिका आपटे ज्या पुस्तकाबद्दल या सिरिजमध्ये बोलताना दिसते आणि ज्यावर बोलते हे तिचे कामं आहे. जे या सिरिजमधून चोरण्यात आलेले आहे. अशावेळी तिनं सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं यावर आक्षेप घेतला होता. दोन दिवसांपुर्वी तिनं भलीमोठी पोस्ट लिहित यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसली. आपण एका दलित कुटुंबांतून आलेलो आहोत आणि सोबतच अशावेळी आपलं कामं Made in Heaven नं चोरलं असं म्हणतं तिनं त्यांच्यावर फार मोठे आरोप केलेले होते. त्यामुळे पुन्हा एकदा श्रेय न देता सिरिजमध्ये काम चोरण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. 

हेही वाचा : लग्नापूर्वी भट्ट कुटुंबियांची लेक होती 'या' अभिनेत्याच्या प्रेमात? आज दोघंही सिंगल

यावेळी झोया अख्तरनं स्वत:च्या आणि मेकर्सच्या वतीनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं म्हटलं आहे की, ''लेखिका याशिका दत्त हिनं केलेल्या आरोपांमुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर चुकीचे आरोप पसरवले असून यानं प्रेक्षकांमध्ये संम्रभ आहे. त्यांचे काम आम्ही Made in Heaven मध्ये वापरले आणि त्याला क्रेडिट दिले नाही असा त्यांचा आरोप आहे. ही कथा लग्न आयोजित करणाऱ्या व्यस्थापकांवरती आणि त्या सर्व मुलींवरती फिरते ज्यांना लग्नाच्यावेळी या समाजातील काही रूढी परंपरांना समोरे जावे लागते.''

''या सिझनच्या पाचव्या एपिसोडमध्ये The Heart Skips A Beat मध्ये विदर्भातील पल्लवी माणके म्हणजेच राधिका आपटे हीच मध्यवर्ती पात्र आहे. पल्लवी माणके ही महाराष्ट्रातील आंबेडरकरवादी मुलगी आहे जिनं कोलंबिया युनिवर्ससिटीतून कायद्याच्या विषयात पदवी घेतली आहे. ती पल्लवी कुमार या नावानं मोठी झाली आहे. जी आता तिची स्वत:ची खरी ओळख घेऊन जगासमोर आलेली आहे. जी दलित आहे. पल्लवी माणके ही एक शिक्षिका आहे. तिला Amnesty पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यातून तिनं आपली स्वत:ची ओळख ही तिनं आपल्या बळावर मिळवली असून यावेळी तिच्या सासऱ्यांच्याकडून मात्र तिला यावरून त्रास सहन करावा लागतो आहे. यावेळी तिची ओळख जी आहे त्यानुसार तिचे लग्नही व्हावे अशी तिची इच्छा असतात ते होणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''यातून आम्ही कुठेच याशिक दत्त आणि त्यांचे पुस्तक Coming Out As Dalit यातून काहीच घेतलेले नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे सर्व आरोप हे फेटाळून लावतो आहोत.'', असं ती यावेळी म्हणाली आहे.