TRP मध्ये अव्वल 'झी मराठी' वाहिनी इंस्टाग्रामवर ही अव्वल

झी मराठी इंस्टाग्रामवरही अव्वल 

शैलेश मुसळे | Updated: Nov 28, 2019, 03:40 PM IST
TRP मध्ये अव्वल 'झी मराठी' वाहिनी इंस्टाग्रामवर ही अव्वल title=

मुंबई : झी नेटवर्कमधील पहिली प्रादेशिक वाहिनी आणि इतर सर्व नेटवर्कच्या प्रादेशिक वाहिन्यांमधील ही पहिली प्रादेशिक वाहिनी असलेली झी मराठी वाहिनी टीआरपीमध्ये अव्वल तर आहेत. पण आता इंस्टाग्रामवर ही झी मराठी अव्वल ठरली आहे. प्रादेशिक वाहिनी असलेल्या झी मराठीने इंस्टाग्रामवर 10 लाख फॉलोअर्स पूर्ण केले आहे. नेहमीच वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून झी मराठीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी ही या वाहिनीला आपल्या मनात नेहमी मानाचं स्थान दिलं आहे. 

नेहमीच्या मालिका अपडेट्स सोबतच कलाकारांच्या पडद्यामागील गमतीजमती, इंस्टाग्राम Live, इंस्टाग्राम टेकओव्हर, पडद्यामागील काही खास क्षण जे लोकांना सोशल मीडियावर पाहायला आवडतात. इव्हेन्ट, अवार्ड्स शो अशा काही खास क्षणांचे Live अपडेट्स या आणि अशा अनेक गोष्टींद्वारे प्रायोगिकता जपण्याचा झी मराठी नेहमीच प्रयत्न करते. डिजिटल माध्यमाद्वारे लोकांना सर्व काही instant आणि Impactful हवं असतं आणि त्यांची ही गरज सातत्याने कशी पूर्ण होईल यासाठीच झी मराठी वाहिनी प्रयत्नशील आहे.

झी नेटवर्कच्या इतर वाहिन्यांचे फॉलोअर्स देखील झपाट्याने वाढत आहे. 

झी मराठी - 10,23,348
झी टॉकीज - 4,67,366
झी युवा - 3,97,050
झी टीव्ही - 6,51,505