'भटकंती'कार मिलिंद गुणाजींकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

मिलिंद गुणाजी-उद्धव ठाकरेंची खास मैत्री 

Updated: Nov 28, 2019, 02:56 PM IST
'भटकंती'कार मिलिंद गुणाजींकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा  title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा सायंकाळी शिवतीर्थावर संपन्न होणार आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवरांसोबतच कलाकार मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बॉलिवूडचे आणि मराठीत कलाकार असणार आहेत. 

उद्धव ठाकरे हे तसे मितभाषी असले तरीही अभिनेता मिलिंद गुणाजी हे त्यांच्या अगदी जवळचे मित्र. मिलिंद गुणाजी यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. 'आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र आणि आमचे अगदी जवळचे मित्र उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर निराजमान होणार आहेत. ज्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून मातोश्रीचा, सेनेचा स्नेहसंबंध आहे. अतिशय सुसंस्कृत, सहृदय माणूस Gem of Person. ज्यांच्याकडे उत्कृ्ष्ठ ऍडमिनिस्ट्रेटिव क्वालिटीज सुद्धा आहेत. असा माणूस या पदावर बसतोय याचा खरंच आनंद होतोय. आमच्या सगळ्यांकडून त्यांना मनापासून शुभेच्छा.  '

मिलिंद गुणाजी आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीबद्दल आपण सारेच जाणतो. हे दोघं अनेकदा भटकंती करता एकत्र जातात. मिलिंद गुणाजींना भटकंतीची प्रचंड आवड आणि उद्धवजींना फोटोग्राफीची. या दोन्ही मेळ खूप चांगला जुळून येतो. मिलिंद गुणाजी यांच्या 'हवाई मुलूखगिरी' या पुस्तकातील सर्व छायाचित्र ही उद्धव ठाकरेंनी टिपलेली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची माहिती असून यामध्ये एरिअर शॉर्ट घेऊन गडकिल्यांच अनोख दर्शन उद्धव ठाकरेंनी घडवून आणलं आहे.

मिलिंद गुणाजींसोबत उद्धव ठाकरे अनेकदा भटकंतीकरता बाहेर पडले आहेत. या दोघांच्या मैत्रीतून अनेक उत्तम कलाकृती सादर झाल्या आहेत. शपथविधी सोहळ्याला मिलिंद गुणाजी यांची उपस्थिती असेल यात शंका नाही. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील आमिर खान, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, आशा भोसले आणि इतर कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याच्या संपूर्ण सेटची तयारी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई करत आहेत.