मुंबई : झी मराठीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडते. या मालिकेशी प्रेक्षक जोडला जात असतो. या मालिकेतील घटनांशी प्रेक्षक संबंध लावत असतो. झी मराठीवरील मालिका 'देवमाणूस' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. (Zee Marathi Devmanus Serial may go off air on TV )
16 ऑगस्टपासून झी मराठीवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ती परत आलीय’ ही मालिका झी मराठीवर रात्री साडेदहा वाजता सुरु होणार आहे. याचा प्रोमो रविवारी प्रसारित झाला आणि ‘देवमाणूस’च्या चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
'देवमाणूस' ही मालिका अगदी सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. मालिकेच्या शिर्षकगीताला विरोध करण्यात आला होता. 'डॉ. अजित कुमार देव' ही भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडने प्रेक्षकांचं मन जिंकलं. किरण गायकवाड याची ही पहिलीच प्रमुख भूमिकेतील मालिका आहे.
या मालिकेतील डिम्पल, टोण्या, आजी या पात्राचं देखील कौतुक झालं. मर्डर मिस्ट्रीवर आधारित असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचं चांगलच मन जिंकलं. डॉ. अजित कुमारच्या आयुष्यात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होत आहे. चंदा ही व्यक्तिरेखा लवकरच मालिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही भूमिका अभिनेत्री माधुरी पवार निभावणार आहे. टीव्हीवर अजितकुमारची निर्दोष सुटका होणार का? ही बातमी पाहून चंदा गोंधळात पडते. या चंदाचा चेहरा पाहून कोर्टात अजितकुमारची शुद्ध हरपते. ही चंदा नक्की आहे तरी कोण? हिचा आणि देवीसिंगचा काय संबंध आहे? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.