ये है मोहब्बतें मधील 'या' अभिनेत्रीला पुत्ररत्न!

अभिनेत्री मिहिका वर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

Updated: Jul 3, 2018, 11:28 AM IST
ये है मोहब्बतें मधील 'या' अभिनेत्रीला पुत्ररत्न! title=

मुंबई : टी.व्ही. वरील लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बते' ईशी मां (दिव्यांका त्रिपाठी) च्या बहीणीची भूमिका करणारी अभिनेत्री मिहिका वर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. मिहीकाने अलिकडेच गोंडस मुलाला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात ती आपल्या पतीसोबत आहे.

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना तिने एक स्पेशल मेसेज लिहिला आहे. तिने लिहिले की, Knock, knock. यावरुन तिच्या घरी नवा चिमुकला पाहुणा येणार असल्याचे स्पष्ट होते. 

 

Knock knock...

A post shared by Mihika Kapai (@mihikavarma1) on

२०१६ मध्ये मिहिका बॉयफ्रेंड आनंद कपाईसोबत विवाहबद्ध झाली. आनंद कपाई एनआरआय बिजनेजमॅन आहे. त्यांनी अतिशय गुपचूप विवाह केला. त्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या लग्नाची खबर सर्वत्र पसरली. 
आता मुलाच्या जन्माची बातमी मिहिकाच्या भावाने मिस्किट वर्माने सर्वात आधी शेअर केली. मिस्किट वर्मा देखील टी.व्ही. कलाकार आहे. 

प्रेग्नेंसीमुळेच एकता कपूरची हिट सिरियल ये हैं मोहब्बते मध्ये मिहिकाची व्यक्तिरेखा आता अवंतिका हंडल साकारत आहे. 

 

Zindagi

A post shared by Mihika Kapai (@mihikavarma1) on

मिहिका वर्माने २००४ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब पटकवला. त्याने तिने अभिनयातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने 'तुझ संग प्रीत लगाई सजना', 'कितनी मोहब्बत है', 'किस देस में है मेरा दिल', 'तारक मेहता का उल्टा चश्मा', 'बात हमारी पक्की है', 'ये है आशिकी, अजीब दास्तां है ये' आणि 'इतना करो न मुझे प्यार' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले.