भटकती आत्मा, असली-नकली, पक्षांतर्गत धुसफूस आणि बारामतीत नणंद वि. भावजय... लोकसभा निवडणुकीत गाजलेले मुद्दे

 राज्यात लोकसभेचं पाचही टप्प्यातील मतदान पार पडलंय.. यंदाची  लोकसभा निवडणूक अनेक महत्वाच्या मुद्द्यांनी गाजली.

Updated: May 20, 2024, 09:58 PM IST
भटकती आत्मा, असली-नकली, पक्षांतर्गत धुसफूस  आणि बारामतीत नणंद वि. भावजय... लोकसभा निवडणुकीत गाजलेले मुद्दे title=

Loksabha Election 2024 : राज्यातील लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं.. 2024 ची लोकसभा निवडणूक राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणांसोबतच अनेक मुद्द्यांमुळं गाजली.. हे मुद्दे कोणते ते जाणून घेऊया. 

बारामतीमध्ये नणंद वि. भावजय

सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती.. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयमध्ये झालेली लढत ही सर्वाधिक लक्षवेधी ठरली.. पवार विरुद्ध पवार झालेल्या या सामन्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होताना दिसले.

भटकती आत्मा 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता भटकती आत्मा असा जोरदार घणाघाती हल्ला प्रचारादरम्यान चढवला.  केला होता.. त्यानंतर शरद पवार यांनीही त्यावरून मोदींना सडेतोड उत्तर दिलं. होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी मी शंभर वेळा अस्वस्थ राहीन...अशा शब्दांत परावांनी मोदींना सुनावलंय...तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेनं जाताय असा आरोपही पवारांनी केला. 

असली-नकली

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी राज्यातील प्रचारा दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला नकली म्हणत वारंवार हिणवलं... असली पक्ष-नकली पक्ष हा मुद्दाही प्रचंड चर्चेत राहिला..त्याला शरद पवार आणि ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

महायुती असो की मविआ दोन्हीकडे अंतर्गत धुसफूस रंगली... ठाणे - नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने गणेश नाईक नाराज झाले त्यांची समजूत काढण्यासाठी फडणवीसांना मैदानात उतरावं लागलं नाशिकमध्ये अमित शाहांनी सांगूनही उमेदवारी जाहीर व्हायला विलंब झाला. त्यामुळे नाराज झालेल्या भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतली.  भिवंडी - सुरेश म्हात्रेंना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या दयानंद चोरगेंनी राजीनामा दिला.  पुण्यात भाजपमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीमुळे जगदीश मुळीक नाराज झाले. तर दुसरीकडे पुण्यातच पुणे - काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज झाले.  कल्याणमध्ये गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील वात सर्वश्रूत आहे..गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड जेलमध्ये आहेत. गायकवाड यांच्या पत्नी थेट शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारात उतरलेल्या दिसल्या.

पैसे वाटप

दरम्यान पैसे वाटपाच्या अनेक तक्रांरींमुळं यंदाची निवडणूक वादग्रस्त ठरली. शरद पवार, रोहित पवार यांनी पैसे वाटपाचे आरोप केले.. रोहित पवारांनी तर पैसे वाटपाचे एका मागोमाग एक व्हिडिओ ट्विट करत खळबळ उडवून दिली. ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटानं भाजप उमेदवार मिहीर कोटेचांवर पैसे वाटपाचा आरोप करत, राडा घातला.

अशा एक ना अनेक मुद्द्यांनी यंदाची लोकसभा निवडणुक गाजली. आता मतदारांना त्यापैकी कोणते मुद्दे भावले आणि कोणते आवडले नाहीत, याचं उत्तर 4 जूनला मतदानातून समजणार आहे.