काही म्हणा माझा गुन्हा! असं का म्हणते सोनाली कुलकर्णी?

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही असं का म्हणते असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर पाहा हा व्हिडीओ...

दिक्षा पाटील | Updated: Oct 12, 2023, 11:57 AM IST
काही म्हणा माझा गुन्हा! असं का म्हणते सोनाली कुलकर्णी? title=
(Photo Credit : Social Media)

Kahi Mhana Maza Gunha Sonali Kulkarni : वडील आणि मुलाच्या नाजूक नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अॅन्ड स्वीट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटा विषयी अनेकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी याच चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता या चित्रपटातील 'काही म्हणा माझा गुन्हा' हे गाणं प्रदर्शित झाले आहे. लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता श्रीधर वत्सर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे सुरेख गाणे आनंदी जोशीने गायले असून या रोमँटिक गाण्याचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. या संतोष मुळेकर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.  

या गाण्यात सोनाली कुलकर्णी आणि श्रीधर वत्सर यांची आतुरतेनं वाट पाहताना दिसत आहे. त्यांच्यातील हे गोड नाते, निरागस प्रेम खूपच सुंदर आहे. गाण्याचे बोलही तितकेच मधुर आहेत. साथीदाराला भेटण्याची ओढ या गाण्यातून व्यक्त होत आहे. या गाण्याबद्दल दिग्दर्शक गणेश कदम म्हणतात, 'आज या चित्रपटातील दुसरे गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. साथीदाराबद्दल असलेली प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त होत आहे. हे सुंदर गाणे नक्कीच सगळ्यांना आवडेल. नवरा बायकोच्या एकत्र बसून गप्पा मारणे, जेवण बनवणे, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करण्यातली एक गंमत, भावनिक क्षण या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. यातूनच खरं प्रेम बहरते. मंगेश कांगणे यांचे बोल आणि संतोष मुळेकर यांचे संगीत आणि त्याला लाभलेला आनंदी जोशीचा आवाज हे समीकरण खूप मस्त आहे.'

हेही वाचा : 'अशा लोकांना वेड्यांच्या रुग्णालयात...', फॅशन शोमध्ये रॅम्पवर हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडचा डान्स पाहून नेटकरी हैराण

तर या आधी या चित्रपटातील ‘मन मतलबी’ हे भावनाप्रधान गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मंगेश कांगणे यांचे बोल लाभले आहेत तर हे हृदयस्पर्शी गाणे नकाश अझीझ यांनी गायले आहे. हर्षद अतकरी याच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे बोल मनाच्या खोलवर जाणारे आहेत. हर्षदचा कॅालेज हॅास्टेलपासून घरापर्यंतचा प्रवास या गाण्यात दिसत असून या दरम्यान त्याला अशा गोष्टी दिसत आहेत, ज्या त्याच्या मनाला अस्वस्थ करत आहेत. मनात त्याच्या काही द्वंद सुरू आहे. अतिशय श्रवणीय असे हे गाणे असून प्रत्येक शब्दात भावार्थ आहे. 

पाहा गाण्याचा व्हिडीओ - 

गणेश दिनकर कदम दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर यांच्यासोबत या चित्रपटात हर्षद अतकरी, रसिका सुनील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 3 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत पायल गणेश कदम, विनोद राव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.