... याकारणामुळे निक-प्रियंकाच्या रिसेप्शनला शाहरूख, आमिर आणि अक्षय गैरहजर

कारण ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल 

... याकारणामुळे निक-प्रियंकाच्या रिसेप्शनला शाहरूख, आमिर आणि अक्षय गैरहजर  title=

मुंबई : बॉलिवूडची देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूड गायक निक जोनस 2 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. यानंतर या दोघांनी 20 डिसेंबर रोजी गुरूवारी आपल्या बॉलिवूडच्या खास मित्र परिवारासाठी रिसेप्शन ठेवलं. या रिसेप्शनला सिनेसृष्टीतील सगळी मंडळी उपस्थित होते पण काही सुपरस्टार मात्र गैरहजर राहिले. 

ज्यामध्ये अक्षय कुमार, आमिर खान आणि शाहरूख खान सारखे कलाकार अनुपस्थित होते. प्रियंकाने यांना आमंत्रणंच दिलं नाही? की या कलाकारांनी येणं टाळलं? असे अनेक प्रश्न साऱ्यांनाच पडले पण असं काही नाही... 

आमिर खानबद्दल बोलायचं झालं तर तो 20 डिसेंबरला आपल्या बिग बजेट 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या प्रमोशन करता चीनमध्ये होता. तर शाहरूख खानने देखील याच दिवशी आपल्या 'झिरो' सिनेमाच्या टीमकरता खास पार्टी ठेवली होती. 

Watch Video: महफिल में जमा रंग, 'देसीगर्ल' सॉन्ग पर 'विदेशी बॉय' निक ने लगाए ठुमके

ज्या पार्टीत शाहरूख आणि गौरी पाहुण्यांची खातीरदारी करताना अगदी उशिरापर्यंत व्यस्त होते. कारण 21 डिसेंबर रोजी झिरो सिनेमा प्रदर्शित होणार होता. 

अक्षय कुमारबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्या घालवत आहे. भारतात नसून अक्षय कुमार बाहेर गावी आहे. यामुळे या कलाकारांना रिसेप्शनला उपस्थित राहणं जमलं नाही. 

See the photos of Priyanka-Nick Mumbai reception

मुंबईच्या हॉटेल ताज लॅन्ड एन्डमध्ये या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड तारकांचा जलवा काही औरच होता. जान्हवी कपूर, सारा अली खान, अनुष्का शर्मा या देखील या सोहळ्यात उपस्थित झाल्या होत्या. प्रियांका आणि निक यांचं मुंबई अगोदर दिल्लीतही एक रिसेप्शन पार पडलं... यासाठी खुद्द पंतप्रधान मोदींनीही हजेरी लावली होती 

रणवीर सिंग - दीपिका पादूकोण हे नवविवाहीत जोडपंही या रिसेप्शनसाठी हजर झालं होतं. प्रियांका चोपडा आणि निक जोनास यांचा या कार्यक्रमातील उत्साहही पाहण्यासारखा होता