50 लाख लोकांनी पाहिला Sunny Leone चा 'हा' व्हिडिओ

सनीच्या या 2 व्हिडिओंना अधिक पसंती 

50 लाख लोकांनी पाहिला Sunny Leone चा 'हा' व्हिडिओ title=

मुंबई : बोल्ड अंदाजासाठी लोकप्रिय असलेली अभिनेत्री सनी लिओनीचा नवा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 4 दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला 50 लाखहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. या गाण्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

या गाण्याचे बोल आहेत 'लवली एक्सीडेंट'. सनीचा या गाण्यावर एकदम वेगळाच अंदाज आहे. 3 मिनिटं 15 सेकंदाचा या व्हिडिओला तापेश आणि हरजोत कौरने आवाज दिला आहे.

या गाण्याचे बोल श्लोक लालने लिहिले आहेत. गाण्यात सनी लिओनने  हिरव्या रंगाचा लहेंगा घातला आहे. तिचा अंदाज भरपूर दिलकश असून आपल्या डोळ्यांनी लोकांना घायाळ करत आहे. 

त्यांच्या या व्हिडिओत कॉमेडिअन कृष्णा क्रेझी झालेला दिसत आहे. हे गाणं कृष्णा आणि सनी लिओनीवर चित्रित केलं आहे. 

4 डिसेंबर रोजी Zee Music Company द्वारे युट्यूबवर आणखी एक व्हिडिओ अपलोड जाला. यामध्ये 14 लाखाहून अधिक लोकांनी पाहिल्याचं कळत आहे. टेंशन वाली रात असं या गाण्याच नाव असून हा व्हिडिओ खूप लोकप्रिय ठरला आहे. करिश्मा तन्ना देखील या व्हिडिओ दिसत आहे. हे गाणं नेहा कक्कड आणि फरहाद भिवांडीवालाने गायलं असून गाण्याचे बोल अरकोचे आहेत. हा व्हिडिओ देखील अधिक व्हायरल झाला आहे.