Usha Nadkarni Birthday : माहेरची साडी हा चित्रपट आणि पवित्र रिश्ता या मालिकेमधून उषा नाडकर्णी घराघरापर्यंत पोहोचल्यात. या चित्रपट आणि मालिकेमुळे खाष्ट सासू अशी त्यांची ओळख निर्माण झाली. सुस्पष्ट आवाज, फटकळ स्वभाव आणि रोखठोक बोलणं हा त्यांचा स्वभावामधील खास गुण आहेत. अलका कुबल, रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, किशोरी शहाणेसोबतचा त्यांच्या हा मराठी चित्रपट रेकॉर्डब्रेक ठरला होता.
उषा नाडकर्णी या माहेरच्या उषा कलबाग, त्यांची आई शाळेत शिक्षिका होत्या. त्यामुळे आई अतिशय कडक शिस्तेची होती. त्यांना उषा यांचे नाटकात काम करणे, त्यासाठी दौऱ्यावर जाणे आवडत नव्हतं. पण जेव्हा माझ्या कामासाठी बक्षीण मिळाल्या लागलं तेव्हा आई वडिलांना वाटलं मी चांगल काम करतेय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले त्यांच्या या नाटकातील कामामुळे घरातून हकलून देण्यात आलं होतं. पण नंतर त्यांचं कौतुक पाहून त्यांना घरात घेण्यात आलं.
हो, उषा नाडकर्णी यांना ऑडिशनच्या नावाने अतिशय राग येतो. त्या म्हणतात की, इतके वर्ष काम करुनही जर कोणी ऑडिशन द्यायला या असं म्हटल्यावर भयंकर राग येतो. त्यांनी एका कार्यक्रमात लूक टेस्टबद्दलही एक किस्सा सांगितला होता. त्यांना एकदा फोन आला की, तुम्हाला उद्या लूक टेस्टसाठी यायचं आहे. त्यावर मी म्हटलं फ्रॉक घालयचा आहे की बिकिनी? माझी कसली लुक टेस्ट घेता?
उषा नाडकर्णी यांनी आउ या नावामागील गुपित एकदा सांगितलं होतं. त्या म्हणाल्या की, जेव्हा त्या कामावर जायचा तेव्हा त्यांचा मुलगा खूप लहान होता. त्यामुळे त्या मुलाला आईकडे सोडून जायचा. डोळ्यासमोर कायम आई दिसायची म्हणून तो आजीला आई म्हणू लागला. आईने त्याला सांगितलं उषा नाही ही तुझी आई आहे. एकदा जेव्हा मी कामावरुन परतली तेव्हा मुलाने आउ म्हणून हाक मारली. मला ती खूप आवडली. तेव्हापासून तो मला आउ म्हणायला लागला.
एक दिवस मी नशीबवान चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी मुलाला घेऊन गेली. तेव्हा तो तिथेही मला आउ म्हणून हाक मारत होता. त्यावेळी माझी सहकलाकार अलका कुबेल होती. तिने ते ऐकलं आणि तिलाही ते खूप आवडलं. तिनेही आउ म्हणून हाक मारायला सुरुवात केली. त्यानंतर समीर आठल्येंनी ऐकलं तो आउ म्हणायला लागला.
बस मग हळूहळू सिनेमाचं सगळं युनिट त्यांना आउ म्हणायला लागलं. त्यादिवसापासून चित्रपटसृष्टी मुलामुळे मला आउ हे नावं मिळालं. त्या पुढे म्हणाल्या की, आउ या शब्दाचा अर्थ सांगताना त्या म्हणाल्यात की, आ म्हणजे आई आणि उ म्हणजे उषा असा आहे. त्यामुळे मला तो खूप आवडतो.
उषा नाडकर्णी यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटाशिवाय बँकेतही काम केलंय. एका कार्यक्रमादरम्यान ताई तुम्ही अनेक वर्ष बँकेत नोकरी केली. एखाद्या निर्मात्याने तुमचे पैसे दिले नाहीत तर तुम्ही त्याच्याकडून ते चांगलेच वसूल केले असतील? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला, त्या म्हणाल्या की, 'एका मालिकेचे त्यांनी फक्त 10 एपिसोड केले आणि ती त्यांनी काही कारणाने सोडली. त्यानंतर मॅनेजरला अनेक फोन लावल्यानंतही तो पैसा देत नव्हता. मुळीत जेव्हा मी मॅनजरेला फोन करायची तेव्हा दुसरा व्यक्ती फोन उचलायचा आणि मॅनेजर नाही असं सांगायचा. एक दिवस माझं नशीब चांगल आणि त्याचं खराब माहिती नाही, मॅनेजरने फोन उचला तेव्हा मी त्याला म्हणाली की, माझे पैसे देणार आहेस की नाही. नाहीतर मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन तुझी चड्डी खोलेन आणि पैसे घेऊन जाईल. त्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्या घरी चेक आला. '