मुंबई : आलिया भट्टने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेग्नंट असल्याची घोषणा केली. एप्रिलमध्ये लग्न केल्यानंतर दोघंही खूप व्यस्त आहेत. आलिया लंडनमध्ये तिच्या हॉलीवूड डेब्यू 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटाचें शूटिंग करत असताना, रणबीर 22 जुलै रोजी रिलीज होणाऱ्या 'शमशेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, रणबीरने त्याच्या आवडता क्रमांक '8' बद्दल असं काही सांगितलं की, तो आणि आलिया क्रमांक '8'चा टॅटू करण्याचा विचार करत आहेत.
आलिया भट्टनेही विचारपूर्वक तिच्या ब्राइडल लूकमध्ये 8 वा क्रमांक ठेवला आहे. अभिनेत्रीने रणबीरचं पहिलं अक्षर 'R' आणि '8' मधील मेहंदी डिझाइन निवडल्याचं सांगितलं जातं. तिने मंगळसूत्र आणि कलेरे घातले होते, ज्यावर '8' क्रमांकाची रचना होती. आलियाच्या बांगड्या सेटमध्येही एकूण आठ बांगड्या होत्या.
रणबीरसाठी '8' हा नंबर महत्त्वाचा आहे कारण
'8' नंबरबद्दल बोलताना रणबीर म्हणाला, "यात कोणतीही अंधश्रद्धा नाही, माझ्या आईचा वाढदिवस 8 जुलैला असतो आणि तो फक्त एक नंबर आहे. आणि जो मी तिच्याशी जोडला आहे. मला 8 क्रमांक आवडतो कारण तो infinity सारखा दिसतो.
आलिया भट्टने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती गर्भवती असल्याची घोषणा केली. एप्रिलमध्ये लग्न केल्यानंतर दोघंही खूप व्यस्त आहेत. आलिया लंडनमध्ये तिच्या हॉलीवूड डेब्यू 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटाचं शूटिंग करत असताना, रणबीर 22 जुलै रोजी रिलीज होणाऱ्या 'शमशेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, रणबीरने त्याच्या आवडत्या क्रमांक '8' बद्दल सांगितलं की, तो आणि आलिया '8' नंबरचा टॅटू करण्याचा विचार करत आहेत.