स्वरा भास्करला मिळाली जीवेमारण्याची धमकी, अभिनेत्रीने उचललं मोठं पाऊल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Updated: Jun 30, 2022, 09:00 PM IST
स्वरा भास्करला मिळाली जीवेमारण्याची धमकी, अभिनेत्रीने उचललं मोठं पाऊल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अलीकडेच अभिनेत्रीला तिच्या वर्सोवा येथील घरी पत्र पाठवून धमकी देण्यात आली आहे. यानंतर स्वराने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला
स्वराला हे धमकीचं पत्र कोणी पाठवलं आहे. याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की, त्यांनी तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. स्वराला मिळालेलं पत्र हिंदीत लिहिलेलं असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये अभिनेत्रीला वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल हा इशारा देण्यात आला आहे.
 
वीर सावरकरांमुळे स्वराला धमकी मिळाली

वीर सावरकरांचा अपमान देशातील तरुण अजिबात सहन करणार नाही, असं या पत्रात म्हटलं आहे. स्वराला मिळालेलं हे पत्र आक्षेपार्ह शब्दांनी भरलेलं आहे. पत्राच्या शेवटी 'देशाचा तरुण' अशी सही आहे. स्वराला इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. स्वरा कोणत्याही विषयावर आपलं मत मोकळेपणाने व्यक्त करते.