'भाड में जा...', सलमानच्या भेटीविषयी असं का म्हणाला अशनीर ग्रोव्हरनं?

Ashneer Grover on meeting Salman Khan :  अशनीर ग्रोव्हरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आणि सलमान खानच्या भेटीविषयी वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 25, 2023, 12:51 PM IST
'भाड में जा...', सलमानच्या भेटीविषयी असं का म्हणाला अशनीर ग्रोव्हरनं? title=
(Photo Credit : Social Media)

Ashneer Grover on meeting Salman Khan : शार्क टॅंकमुळे चर्चेत आलेला बिझनेसमॅन अशनीर ग्रोव्हर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अशनीर त्याच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळला जातो. या सगळ्यात आता अशनीरची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तो बॉलिवूडचा भाईजान सलमान खानविषयी बोलताना दिसत आहे. यावेळी अशनीर त्याची आणि सलमानची भेट कशी झाली होती याविषयी सांगितलं आहे. यात अशनीर सलमानची स्तुती करतो आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यावर वक्तव्य करतोय.

सलमानच्या भेटीविषयी अशनीरचा खुलासा

पॉडकास्टमध्ये अशनीर ग्रोवर या भेटीविषयी सांगताना म्हणाला की 'मी शाहरुख खानला कधी भेटलो नाही. सलमानला भेटलो आहे. त्याला आम्ही स्पॉन्सर ठेवलं होतं, त्यामुळे त्याच्या एका शूटसाठी मी भेटलो होतो. शूटच्या आधी त्याला सगळी माहिती देण्यासाठी की कंपनी काय आहे आणि इतर गोष्टी सांगण्यासाठी भेटलो होतो. त्यावेळी त्याच्यासोबत तीन तान बसलो होतो. त्याच्या मॅनेजरनं सांगितलं होतं की तो फोटो काढणार नाही. सरांना आवडतं नाही. मी म्हणालो... खड्यात जा तू, नाही काढणार मी फोटो. (साले नहीं खिंचवाऊंगा फोटो, भाड़ में जा तू।) म्हणजे हे असलं कसलं वागणं.'

अशनीर पुढे म्हणाला की 'तो खूप हुशार आहे. म्हणजे लोकांना वाटतं की तो हवेत आहे, पण तो खरंच खूप स्मार्ट आहे. त्याला बिझनेस काय आहे हे कळतंय. त्याला ब्रॅंडिंग समजते. त्याला त्याची इमेज माहितीये की काय आहे. जेव्हा आम्ही जाहिरात बनवत होतो तेव्हा सलमाननं मला सांगितलं की जाहिरातीत मला लार्जर देन लाइफ दाखव, म्हणजे मी सलमान खान आहे असे दिसायला हवे त्या जाहिरातीत. मी नुकताच ट्यूबलाईट चित्रपट केला, तर ट्यूबलाईटमध्ये मला मंदबुद्धी दाखवल्याने तो चित्रपट फ्लॉप झाला आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. इसम काही प्रेक्षकांना आवडत नाही. तर माझा असं झालं की त्याला बिझनेस कळतो त्यामुळे तो खूप मस्त आहे.' 

हेही वाचा : 'आलियाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न', 'टॉक्सिक नवरा आहेस' म्हणणाऱ्यांना रणबीरचं उत्तर; म्हणाला, "जे लोकं..."

दरम्यान, लक्षवेधी गोष्ट अशी आहे की सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'टायगर 3' मुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून. ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटात सलमानसोबत पुन्हा एकदा कतरिना कैफ ही झोयाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हा चित्रपट दिवाळीच्या मुर्हूतावर म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.