उत्सुकता, आव्हानं आणि बरच काही अस का म्हणते अमृता खानविलकर?

Amruta Khanvilkar :  अमृता खानविलकरन का म्हटलं उत्सुकता, आव्हानं आणि बरच काही... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 10, 2024, 03:09 PM IST
उत्सुकता, आव्हानं आणि बरच काही अस का म्हणते अमृता खानविलकर?  title=
(Photo Credit : Social Media)

Amruta Khanvilkar : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता खालविलकर कायम नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. अमृता आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही नवी भूमिका 'जज' ची असल्याचं कळतंय. काही दिवसापूर्वी झी मराठीवर अमृताच अपहरण झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि नुकताच झी ने यामागच कारण देखील सांगितलं आहे. 

अमृतानं या आधी देखील अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा ती या लहाणमुलांसोबत दंगा करायला सज्ज आहे. अमृता ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा सांभाळणार असून सोबतीला संकर्षण कऱ्हाडे देखील असणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अमृता या बद्दल बोलताना म्हणते 'खरंतर या शोसाठी मी खूप उत्सुक आहे आणि एवढ्या लहान कलाकारांना जज करणं माझ्यासाठी आव्हानं आहे. आजवर अनेक शो साठी परिक्षक झाले, पण हा कार्यक्रम खूप खास आहे. लहान मुलासोबत दंगा करायला मज्जा येणार आहे आणि अजून गंमतजमत यात होणार आहे"

कायम ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून अमृता ओळखली जाते तिच्या सोशल मीडिया पोस्ट कायम चर्चेत असतात आणि आता ती ड्रामा ज्युनिअर्स मध्ये दिसणार असल्यानं प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. मराठी सोबतीनं हिंदीत सुद्धा अमृतानं बहुआयामी भूमिका करून प्रेक्षकांना मोहित केलं आहे. एखाद्या कार्यक्रमाचं परिक्षक होण नक्कीच सोप्प नसतं असं देखील ती या निमित्तानं सांगतेय. 

अमृता खानविलकरनं वर्षाची सुरुवात 'लुटेरे' सारख्या दमदार प्रोजेक्टनं केली होती. त्यानंतर 'चाचा विधायक है हमारे 3' आणि नुकतच अमृतानं '36 डे' ची देखील घोषणा केली आहे. अश्या सगळ्या प्रोजेक्ट्सनंतर आता अमृता ड्रामा ज्युनिअर्स कार्यक्रमात परीक्षणाची भूमिका बजावणार आहे. हा शो झी मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अमृता यात देखील तिच्या अनोख्या भूमिकेन प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज होत आहे. शो बद्दलचे अनेक अपडेट ती तिच्या सोशल मीडियावरून देखील देत आहे. 

हेही वाचा : काजोलच्या 'द ट्रायल' सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री नूर मालविकाची आत्महत्या

आगामी काळात अमृता अनेक बड्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार असल्याचं कळतंय. 'कलावती' , 'ललिता बाबर' , 'पठ्ठे बापूराव' , '36 डे सारख्या प्रोजेक्ट्स मधून ती दिसणार आहे. मराठी आणि बॉलिवूडमध्ये अमृता येणाऱ्या काळात दिसणार आहे यात शंका नाही.