काजोलच्या 'द ट्रायल' सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री नूर मालविकाची आत्महत्या

Noor malabika The Trial Actress Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीनं राहत्या घरी केली आत्महत्या

दिक्षा पाटील | Updated: Jun 10, 2024, 02:04 PM IST
काजोलच्या 'द ट्रायल' सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री नूर मालविकाची आत्महत्या title=
(Photo Credit : Social Media)

Noor malabika The Trial Actress Death : 'द ट्रायल' या सीरिजमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नूर मालाबिका दासनं आत्महत्या केल्याचं म्हटले जात आहे. पोलिसांना 6 जून रोजी लोखंडवाला स्थित असलेल्या फ्लॅटमध्ये ती मृताअवस्थेत सापडली आहे. असं म्हटलं जात आहे की नूर मालाबिकानं पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी तिच्या पार्थीवाला शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. रिपोर्ट्स काय येतील त्यावरून सगळी माहिती समोर येईल. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सांगितलं की या घटनाची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा शेजाऱ्यांनी नूर मालाबिकाच्या फ्लॅटमधून वास येण्याची तक्रार केली. त्यांनी लगेच ओशिवारा पोलिस स्टेशनला दिली. जेव्हा पोलिसांची टीम तिथे पोहोचली तेव्हा त्यांनी दरवाजा तोडला आणि आत शिरल्यानंतर त्यांना नूरचं पार्थीव कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेल्या परिस्थिती आढला. पोलिसांनी घरात सगळ्या गोष्टींचा तपास केला, त्यावेळी त्यांना औषध आणि तिचा फोन आणि डायरी मिळाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नूरच्या पार्थीवाला शव विच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठवण्यात आले. तिच्या कुटुंबातील लोकांना संपर्क केला तरी देखील कोणी समोर आलं आहे. हे पाहता पोलिसांनी बेवारस पार्थीवावर अंत्यसंस्कार करणाऱ्या NGO च्या मदतशी रविवारी 9 जून रोजी अंत्य संस्कार केलं. दरम्यान, त्यावर अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तिच्या चाहत्यांना या बातमीनं मोठा धक्का बसला आहे. 

नूर मालाबिका ही आसामची राहणारी आहे. त्याशिवाय तिनं हिंदी चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. त्यात 'सिसकियां', ', 'वॉकमैन', 'तीखी चटनी', 'जघन्या उपाय', 'चरमसुख', 'देखी अनदेखी', 'बॅकरोड हलचल' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर त्याशिवाय तिनं डिज्नी प्लस हॉटस्टार प्रदर्शित झालेल्या 'द ट्रायल' मध्ये दिसली होती. त्या सीरिजमध्ये ती काजोल आणि जीशु सेनगुप्तासोहत दिसली होती. नूर मालाबिका ही आसामच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते होते. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नूर मालाबिकाचे 163K फॉलोवर्स आहेत.