अमर फोटो स्टुडिओतून 'ही' व्यक्ती घेणार निरोप

तुम्हाला काय वाटतं?

अमर फोटो स्टुडिओतून 'ही' व्यक्ती घेणार निरोप  title=

मुंबई : आताची तरूणाई नाटकाकडे वळत नाही. नाटकांना युवापिढीची गर्दी नसते अशी तक्रार होत असताना एका नाटकाने खूप यशस्वीपणे या यंगस्टरला आपल्याकडे खेचून आणलं. आणि हे नाटकं म्हणजे 'अमर फोटो स्टुडिओ'. अमर फोटो स्टुडिओ लवकरच आपले 250 प्रयोग पूर्ण करत आहे. या नाटकामुळे आजचा सोशल मीडियावर बिझी असलेला तरूण वर्ग पुन्हा एकदा नाट्यगृहाकडे वळला. पण आता या नाटकाच्या आणि नाटकातील कलाकारांच्या चाहत्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. या नाटकातील एक कलाकार आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

या नाटकातील कलाकारांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. आणि त्यात त्यांनी सांगितलं की, या नाटकातून एक कलाकार निरोप घेत आहे. पण हे नाटक सुरू राहिल. कारण ते 'अमर' आहे. मात्र नाटकातून कोण निरोप घेईल असा प्रश्न विचारून त्यांनी चाहत्यांना पेचात पाडलं आहे. 

आता प्रेक्षक या फोटोखाली कमेंट करून त्यांना वाटणाऱ्या कलाकारचं नाव लिहीत आहे. आपल्या माहित आहे या नाटकातील चार कलाकार हे 'दुनियादारी'या मालिकेतून आपल्या भेटीला आले. तसेच आता या नाकासोबतच त्यांचे आगामी प्रोजेक्ट सुरू आहेत. जसं की, सुव्रत जोशीचा पार्टी हा सिनेमाचं नुकतंच पोस्टर लाँच झालं. अमेय वाघचे 'कास्टिंग काऊच' ही वेब सिरीज सुरू असून इतर प्रोजेक्ट्स देखील आहेत. सखी, पूजा आणि सिद्धेश यांचे देखील आगामी काही प्रोजेक्ट असतील त्यामुळे यातून कोणता कलाकार निरोप घेणार हा 'यक्ष' प्रश्नच आहे. पण झी चोवीस तास डॉट कॉमच्या अंदाजानुसार यातील कोणता कलाकार निरोप घेईल याचा शोध लागला आहे.

ही व्यक्ती घेणार निरोप 

पूजाने आपल्याला माहित आहे, काही दिवसांपूर्वी म्हणजे 17 मार्च 2018 रोजी पूजा ठोंबरे हिच्या पाठीचं दुखणं वाढलं होतं. त्यावेळी नाटकाचा एक प्रयोग रद्द करावा लागला होता. त्यानंतर तिने ते नाटक सुरू ठेवलं. मात्र आमचा असा अंदाज आहे की, पूजाच्या पाठीच्या दुखण्यामुळे बहुदा तिला हे नाटकं सोडावं लागणार आहे. चाहत्यांनी देखील कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमचा देखील असा अंदाज आहे अद्याप नाटकातील मंडळींकडू कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही?

अमर फोटो स्टुडिओ या नाटकाची निर्मिती सुनिल बर्वे यांच्या सुबक आणि कलाकारखानाने केली आहे. तसेच मनस्विनी लता रवींद्र हिने हे नाटक लिहिलेलं आहे. निपुण धर्माधिकारीच्या दिग्दर्शनाचा हात यावर फिरलेला दिसतो. आपल्याला माहितच आहे या नाटकाने मुंबई, पुण्यातच नाही तर लंडनमध्ये देखील प्रयोग केले आहेत.