सारा अली खानसोबत कोण आहे हा 'मिस्ट्री बॉय'?

कोन आहे आहे 'मिस्ट्री बॉय'?

Updated: Jun 30, 2021, 02:15 PM IST
 सारा अली खानसोबत कोण आहे हा 'मिस्ट्री बॉय'?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सारा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कार्तिक आर्यनसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. आता साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आसा फोटो शेअर केला आहे, त्या एका फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. 

फोटोमध्ये ती एका 'मिस्ट्री बॉय'सोबत दिसत आहे. फोटोंमध्ये दिसणार व्यक्ती साराचा मित्र असल्याचं सांगितलं जात आहे. सारासोबत असलेल्या 'मिस्ट्री बॉय'चं नाव  जहान हांडा (Jehan Handa)असं आहे. दोघे समुद्र किनारी आनंद लुटताना दिसत आहे. सध्या तिचा आणि  जहान हांडाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

साराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर,सारा लवकरचं आनंद एल राय दिग्दर्शित 'अतरंगी रे' चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि धनुष देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट 6 ऑगस्ट 2021 प्रदर्शित होणार आहे.  त्यानंतर  सारा 'द इम्मोर्टल अश्वत्थामा' चित्रपटात देखील दिसणार आहे. ज्यामध्ये ती अभिनेता विक्की कौशलसोबत दिसणार आहे.