नसीरूद्दीन शाह हिंदुजा रूग्णालयात दाखल

मॅनेजरने दिली तब्बेतीची माहिती 

Updated: Jun 30, 2021, 02:07 PM IST
नसीरूद्दीन शाह हिंदुजा रूग्णालयात दाखल title=

मुंबई : अभिनेता नसीरूद्दीन शाह यांची तब्बेत बिघडल्यामुळे 29 जून रोजी खार येथील हिंदुजा रूग्णालयात दाखल केलं आहे. अभिनेता शाह यांना निमोनिया झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या फुफ्फुसात पॅच मिळाला होता. ज्यानंतर नसीरूद्दीन शाह यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. नुकतंच त्यांच्या मॅनेजरने नसीरूद्दीन शाह यांच्या तब्बेतीची माहिती दिली आहे. 

मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, आता ते रूग्णालयात दाखल आहेत. डॉक्टरांचं चांगल लक्ष त्यांच्या तब्बेतीकडे आहे. त्यांना निमोनियाची लागण झाली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी रूग्णालयात दाखल केल्यानंतर आता त्यांची प्रकृती ठिक आहे. 

गेल्यावर्षी इरफान खान आणि ऋषी कपूर यांचं निधन झालं. नसीरूद्दीन शाह यांच्या अचानक बिघडलेल्या तब्बेतीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अशावेळी मुलगा विवान शाहने सगळ्यांना वडिलांच्या तब्बेतीची माहिती दिली आहे.