व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कतरिनाला गिफ्ट देणारी 'ती' खास व्यक्ती कोण?

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कतरिनाला विकी कौशलने नाही, तर या खास व्यक्तीने दिली भेट   

Updated: Feb 16, 2022, 12:05 PM IST
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कतरिनाला गिफ्ट देणारी 'ती' खास व्यक्ती कोण?  title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. कतरिना आणि विकी कायम अनेक ठिकाणी लग्नानंतर एकत्र दिसतात. सोशल मीडियावर देखील हे कपल एकमेकांसोबत फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतं. एवढंच नाही तर दोघे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत खास दिवसांचा एकत्र लुटतात.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विकी कतरिनाला भेटण्यासाठी मुंबईत आला. सोशल मीडियावर कतरिनाने दोघांचा फोटो देखील शेअर केला. पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कतरिनाला पती विकीकडून नाही, तर दुसऱ्या एका खास व्यक्तीकडून भेट मिळाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yasmin Karachiwala | Fitness (@yasminkarachiwala)

कतरिनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्या व्यक्ती टॅग करत मिळालेल्या भेटवस्तूचा फोटो स्टोरी म्हणून पोस्ट केला. कतरिनाला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी भेटवस्तू म्हणून एक पदार्थ देणारी व्यक्ती तिची जीम ट्रेनर यास्मीन कराचीवाला आहे. 

फोटो शेअर करत कतरिनाने यास्मीनचे आभार देखील मानले आहेत. 'आभार यास्मीन कराचीवाला... माझी कायमची व्हॅलेंटाईन....' सध्या कतरिनाची स्टोरी तुफान व्हायरल होत आहे.