'ती' खास व्यक्ती आल्यानंतरच होणार बप्पी लहरींवर अंत्यसंस्कार

कोण आहे बप्पी लहरी यांच्या आयुष्यातील 'ती' अत्यंत खास व्यक्ती  

Updated: Feb 16, 2022, 11:53 AM IST
'ती' खास व्यक्ती आल्यानंतरच होणार बप्पी लहरींवर अंत्यसंस्कार title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात ज्येष्ठ संगीतकार, गायक बप्पी लहरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील रुग्णालयात बप्पी दा यांनी अखेरचा श्वास घेतला. क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर कला जगतातील अनेक नामवंत व्यक्ती बप्पी लहरी यांच्या घरी पोहोचत आहेत.

पण एक खास व्यक्ती आल्यानंतरचं बप्पी लहरी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बप्पी दा यांचा मुलगा बाप्पा भारतात आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं समोर येत आहेत. 

बप्पी लहरी यांचा मुलगा परदेशात राहतो. त्यामुळे बाप्पा आल्यानंतर गुरूवारी बप्पी लहरी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

बप्पी लहरी यांच्यावर पवन हंस स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या त्यांच्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांचा मुलगा बाप्पा आणि मुलगी वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. 

बप्पी लहरी यांनी 1970 ते 1980 दरम्यान अनेक सुपरहीट गाणी बॉलिवूडला दिली. त्यांना वेगळ्या प्रकारच्या म्युझिकमध्ये फार आवड होती. आज बॉलिवूडमध्ये डिस्को सॉन्ग्स आहेत, तर त्याचं श्रेय बप्पी दा यांना जात... असं म्हणायला हरकत नाही...