मुंबई : प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांच्या घरी नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या दिमाखात झाली आहे. ए आर रहमान यांची मुलगी खतिजा रहमानने 2022 या वर्षाची सुरुवात नव्या प्रवासाने केली आहे. खातिजाने 29 डिसेंबर 2021 मध्ये साखरपुडा केला आहे. खातिजाने होणाऱ्या पतीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिवाय तिने पतीबद्दल थोडक्यात माहिती देखील दिली आहे.
खतिजाच्या होणाऱ्या पतीचं नाव रियासदीन शेख मोहम्मद आहे. पतीसोबत फोटो शेअर करत खातिजा म्हणाली, 'देवाच्या आशीर्वादाने, उद्योजक आणि ऑडिओ अभियंता रियासदीन शेख मोहम्मद यांच्यासोबत साखरपुडा झाला. 29 डिसेंबरला माझ्या वाढदिवशी माझी एंगेजमेंट झाली, ज्यामध्ये कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते....
तर ए आर रहमान यांच्या होणारा जावई उद्योजक आणि ऑडिओ अभियंता आहे. खतिजाने होणाऱ्या पतीसोबत एक कोलाज बनवून इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पारंपारिक ड्रेसमध्ये दिसत आहे. गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेल्या खातिजाने डिझायनर मास्क लावला आहे.