Pushpa Release Date on OTT : कधी, कुठे आणि कसा पाहता येणार सिनेमा

पुष्पा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित 

Updated: Jan 3, 2022, 11:19 AM IST
Pushpa Release Date on OTT : कधी, कुठे आणि कसा पाहता येणार सिनेमा  title=

मुंबई : पुष्पा सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. असं असताना आता पुष्पा हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत असल्याचं सांगण्यात येत आहे.  कोविड19 आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे "पुष्पा'' हा सिनेमा लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

17 डिसेंबर रोजी पडद्यावर आलेल्या चित्रपटाला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ज्यामुळे तो हिंद-भाषिक प्रेक्षकांमध्ये सर्वात लोकप्रिय दक्षिण-भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे. पुष्पा बॉक्स ऑफिसवर आपली उत्तम कमाई करण्याच्या प्रयत्नात आहे. 

मात्र, कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे चित्रपटगृहात जाण्याबद्दल साशंक असलेले लोक त्याच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा: द राइजचे पोस्ट-थिएटर अधिकार OTT प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon प्राइम व्हिडिओला विकले गेले आहेत. निर्मात्यांनी अद्याप OTT वर पुष्पा चित्रपटाची अधिकृत रिलीजची तारीख जाहीर केलेली नसली तरी, हा चित्रपट जानेवारीच्या मध्यात Amazon Prime Video वर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.

डिलिट केलेला सीन पुन्हा प्रदर्शित 

'पुष्पा' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला देखील. सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्यातील काही सिनेमा काढण्यात आले. मात्र आता नवीन वर्षात सिनेमातील काढलेले सीन पुन्हा एकदा जोडण्यात आले. नवीन वर्षात सिनेमा मेकर्सने चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिलाय. सिनेमा दिग्दर्शकाने एक सीन चक्क सोशल मीडियावरही पोस्ट केला आहे. हाच तो सीन आहे जो सिनेमातून डिलिट करण्यात आलं.