Swades Actress Gayatri Joshi: बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आले आणि गेले ज्यांची प्रचंड चर्चाही झाली परंतु असेही अनेक सिनेमे आहेत ज्यांनी तरूणाईला अक्षरक्ष: वेड लावले होते. त्यातीलच एक सिनेमा आहे तो म्हणजे 'स्वदेस'. 'स्वदेस' या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती. या सिनेमातील शाहरूख खानची हिरोईन गायत्री जोशी तुम्हाला आठवते का? 2004 साली आलेल्या 'स्वदेस' चित्रपटानंतर ती फारशी चित्रपटांमधून दिसली नाही. परंतु तिची सर्वाधिक चर्चा रंगली ती तिच्या लग्नाबद्दल. तिनं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीशी लग्न केले आहे. ज्याचे नाव जगातील सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींच्या यादीत आहे. सध्या ती काय करते तुम्हाला माहितीये का? चला तर मग या लेखात तिच्याविषयी जाणून घेऊया.
गायत्री ही विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे. 2004 साली 'स्वदेस' या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर 2005 मध्ये तिनं कन्स्ट्रक्शन प्रमोटर विकास ओबेरॉयशी लग्न केले आहे. आपल्या या लग्नानंतर तिनं चित्रपटातून कामं करणं सोडून दिलं. त्यानंतर ती फारशी कुठल्याच चित्रपटातून दिसली नाही. तिला रूपेरी पडद्यावर तिच्या चाहत्यांना पाहण्याची इच्छा होती परंतु लग्नानंतर तिनं चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि आपल्या परिवारात ती व्यस्त राहिली. गायत्रीनं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीशी लग्न केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, विकास यांची एकूण संपत्ती ही 22,780 कोटी रूपये इतकी आहे. त्यांचे नाव हे जगातील सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींच्या यादीत येते. इतका पैसा असला तरीसुद्धा गायत्री साधंच आयुष्य जगते. हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजान खानची ती खूप चांगली मैत्रीण आहे. त्यासोबत सोनाली बेंद्रेही तिची खास मैत्रीण आहे. अनेकदा त्या एकत्र ट्रीपला एकत्र जाताना दिसतात. त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि अनेकदा चर्चेतही असतात. गायत्री अनेकदा क्लासी आणि कूल लुकमध्ये वावरताना दिसते. चित्रपटसृष्टीत येण्यापुर्वी तिनं सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. तिनं 1999 साली मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता आणि मग तिनं मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला.
हेही वाचा - अर्शद वारसीच्या मुलीला पाहिलंत का? सुहाना खानलाही देतेय टक्कर
गायत्री जोशीचा जन्म हा नागपूरचा आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या 'स्वदेस या चित्रपटातून तिनं बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यामुळे तिच्या अभिनयाचेही प्रचंड कौतुक झाले होते. तिच्या चाहत्यांना तिला पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहायचे आहे.