बापरे! चक्क सलमान खान म्हणतोय, ''मी रिलेशनशिपमध्ये''...

 बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान 56 वर्षांचा झाला असून तो अजूनही अविवाहित आहे.

Updated: Apr 28, 2022, 03:44 PM IST
बापरे! चक्क सलमान खान म्हणतोय, ''मी रिलेशनशिपमध्ये''... title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान 56 वर्षांचा झाला असून तो अजूनही अविवाहित आहे. आजवर अनेक सुंदरींनी त्याच्या आयुष्यात एंट्री घेतली असली तरी सलमान स्थिरावू शकला नाही. त्याचबरोबर, त्याच्या एका मुलाखतीत सलमानने केवळ त्याच्या रिलेशनशिपबद्दलच नाही तर सोहेल खान आणि अरबाज खान या भावांसोबतच्या नात्याबद्दलही मोकळेपणानं सांगितलं.

जेव्हा सलमान खानला मुलाखतीत विचारण्यात आलं की, ''तुझ्या घरात तुझ्या लग्नाची चर्चा आहे का?'' यावर सलमानने हसत हसत हा प्रश्न टाळला. यानंतर सलमानला विचारण्यात आलं की, तू खरंच एखाद्या मुलीला डेट करत आहेस का? सध्या याबद्दल खूप चर्चा आहे? खरंतर, हा प्रश्न सलमान खानला युलिया वंतूरबद्दल विचारण्यात आला होतं. त्याचबरोबर सलमान खानने या प्रश्नाला उत्तर देत सांगितलं की, 'मी रिलेशनशिमध्ये अजिबात चांगला नाहीये.'

याशिवाय जेव्हा सलमान खानला मुलाखतीत विचारण्यात आलं की, तिन्ही भावांपैकी पापा सलीम खानच्या जवळ कोण आहे, तेव्हा सलमान म्हणाला, 'अरबाज आणि सोहेलचे मित्र माझ्या खूप जवळ आहेत आणि माझे सर्व मित्र सोहेल आणि अरबाजच्या जवळ आहेत. आम्हा तिघांचे सगळे मित्रही पप्पांच्या जवळचे आहेत. त्यामुळे आमची छोटीशी जरी पार्टी झाली तरी ४०० लोक जमतात.