व्हर्जिनीटीबद्दल सलमानचा मोठा खुलासा, ऐकणारेही चक्रावले; Video Viral

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या व्हर्जिनिटीबद्दल बोलताना दिसत आहे. 

Updated: May 7, 2022, 10:26 AM IST
व्हर्जिनीटीबद्दल सलमानचा मोठा खुलासा, ऐकणारेही चक्रावले; Video Viral  title=

मुंबई : अभिनेता सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) यानं वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही तो अविवाहित आहे. असं नेमकं का? हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. त्यानं नेमकं लग्न केलंच का नाही, हाच प्रश्न आजही सातत्यानं विचारला जातो. सलमानच्या लग्नाचा मुद्दा आजही अनुत्तरितच आहे, पण त्याच्या व्हर्जिनिटीबद्दल मात्र एक मोठा खुलासा सर्वांसमोर आला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या व्हर्जिनिटीबद्दल बोलताना दिसत आहे. सहसा या मुद्द्यावर खुलेपणानं बोललं जात नाही, कारण अर्थात हा अतिशय खासगी मुद्दा आहे. 

सलमान मात्र या मुद्द्यावर अतिशय खुलेपणानं बोलताना दिसला. निमित्त होतं ते म्हणजे, 'कॉफी विद करण' (Coffee with Karan). करण जोहरच्या सूत्रसंचालनाचा तडका असणाऱ्या या शोमध्ये समाननं त्याच्या व्हर्जिनीटीबद्दल वक्तव्य केलं होतं. (Karan johar salman khan)

शोमध्ये लग्नाच्या मुद्द्यावर बोलत असतानाच सलमाननं आपण व्हर्जिन असल्याचाही खुलासा केला. अद्यापही आपण शरीरसंबंध न ठेवल्याचं म्हणत व्हर्जिनिटी लग्नासाठी राखून ठेवल्याचं तो या कार्यक्रमात म्हणाला. 

सलमाननं आपण व्हर्जिन असल्याचं सांगताच तिथं समोरच बसलेल्या करणला हसू आलं. त्याला यावर विश्वासच बसेना. पण, चाहत्यांनी मात्र सलमानवर विश्वास ठेवला आणि त्यानं सांगितलेलं सगळं खरं असंच गृहित धरलं.