Aamir Khan Rejected Darr: आमिर खान हा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आहे. सोशल मीडियावर त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. आमिर खानच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. दंगल चित्रपटात आमिर खानच्या मुलीची भुमिका करणारी अभिनेत्री फातिमा सना शेखला डेट करत असल्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. अजूनही ही चर्चा काही थांबत नाही. आताही ही चर्चा सुरूच दिसते आहे. काही वेळापुर्वीच सोशल मीडियावर किरण राव आणि रिना दत्ता यांचे एकत्र फोटो व्हायरल झाले होते. यावेळी त्यांची फार जोरात चर्चा होती. त्यांच्यात फार चांगली मैत्री असून त्या अनेकदा एकत्र स्पॉट होतात. यावेळी त्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आमिर खानचा मागील वर्षी आलेला 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपलं असं काही वेगळं स्थान निर्माण करू शकला नाही त्याउलट त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे सध्या आमिर खान हा चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
यावेळी आमिर खानला जरी प्रेक्षकांनी रिजेक्ट केलं असेल तरीसुद्धा आमिर खानं आपल्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट रिजेक्ट केले होते. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्याच सर्वाधिक चर्चा रंगली होती ती त्याच्या करिअरमध्ये जेव्हा त्यानं Darr हा चित्रपट रिजेक्ट केला होता. त्यामुळे तेव्हा त्यांच्या या Rejection नं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. अशावेळी चर्चा होती ती म्हणजे शाहरूख खान आणि त्याची. शाहरूख खान ही भुमिका चांगली करू शकतो असं त्याला तेव्हा वाटतं होतं. त्यामुळे त्यानं हा भुमिका रिजेक्ट केली होती.
हेही वाचा : सनी देओल आणि डिंपल कपाडिया पुन्हा दिसले एकत्र; पुन्हा जुन्या फोटोची आठवण
2013 साली नोच मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत कॉश्चुमर डिझायनर आणि प्रोड्यूसर शाबिना खान यांनी सांगितले होते की, ''आमिर खाननं शाहरूख खान या रोलसाठी चांगला आहे असे यश चोप्रा यांना कळवले होते. ते 1993 सालच्या डर या चित्रपटाचे कास्टिंग करत होते.'' यावेळी त्या असंही म्हणाल्या होत्या की, ''शाहरूख खानला आमिर खान हा 'डर' या चित्रपटाबद्दलच सांगत होता. त्यानं त्याला हेही सांगितले होते की आमिर खाननं हा चित्रपट नाकारला असून तो शाहरूख खाननं करावा आणि यश चोप्रा यांनाही फोन करावा.''
डर या चित्रपटात एक चांगल्या मुलाचे एका मुलाच्या प्रेमात पडल्यानंतर कसं वाईट रूपांतर होते असं दाखवण्यात आलं आहे.