Nagarjuna Video Viral : गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नापूर्वीचे विधी आणि लग्नाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पारंपारिक पद्धतीने नागा आणि शोभिताचा विवाह सोहळा झाला. शोभिताचा वधू लूक पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहे. नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. नागा आणि शोभिता यांचा साखरपुडाची घोषणा नागार्जुन यांने सोशल मीडिया केल्यानंतर अनेकांचा भुवया उंचावल्यात. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये विवाहबद्ध झाले. पण या संपूर्ण सोहळ्यामध्ये नागार्जुन, सून शोभिता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये नागार्जुन यांची सून शोभितासोबतची एका कृत्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. नागार्जुन यांच्या या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल तर काहींनी त्यांचं कौतुक केलंय.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे श्रीशैलम, आंध्र प्रदेशमधील मल्लिकार्जुन मंदिरात त्यांच्या लग्नाच्या एका दिवसानंतर आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. सुपरस्टार नागार्जुनही या जोडप्यासोबत होता. त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये या जोडप्यासोबत नागार्जुनही पूजा करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील एका क्षणाने लोकांचे लक्ष वेधून घेतलं.
व्हायरल व्हिडीओमध्ये नागार्जुन अक्किनेनी, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला पुजाऱ्यासमोर डोके टेकवताना दिसत आहे. पुजारी त्यांना हळद, चंदन आणि फुलांनी बनवलेले ताट देतात, जेणेकरून ते स्वतःला अभिषेक करू शकतील. जेव्हा पुजारी नागार्जुनच्या कपाळावर चंदन लावतात. त्यानंतर शोभिता धुलिपाला ते चंदन लावण्यास सांगतात. त्यावेळी शोभिता चंदन लावत असताना तिचे मोकळे केस खांद्यावरुन पुढे येतात. तेव्हा नागार्जुन शोभिता चंदन लावेपर्यंत केस मागे धरुन ठेवतो. हे पाहून नेटकऱ्यांनी नागार्जुनला ट्रोल केलंय.
व्हायरल व्हिडीओवर एका चाहत्याने लिहिलंय की, 'तो तिच्या वडिलांसारखा आहे आणि तो तिची काळजी घेतो.' आणखी एका युजरने लिहिलंय, 'मला नागार्जुन खूप आवडतो.' तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, 'हे सुनेचा आदर आणि काळजी देखील दर्शवते.' मात्र, काही लोकांना नागार्जुनचे हे वागणे योग्य वाटले नाही. काहींनी ते अन्यायकारक असल्याचे सांगितलx. सासरा आपल्या सुनेच्या केसांना कसा हात लावू शकतो?