'सेटवर वीड आणि पार्टीमध्ये कोकीन सामान्य गोष्ट आहे.'

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मित्राकडून मोठा खुलासा.     

Updated: Sep 15, 2020, 02:58 PM IST
'सेटवर वीड आणि पार्टीमध्ये कोकीन सामान्य गोष्ट आहे.' title=

मुंबई  : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि अभिनेता-निर्माता युवराज एस सिंहने बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं सेवन हे एक कल्चर म्हणून प्रचलित असल्याचं त्याने सांगितलं आहे. शिवाय बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असल्यास ड्रग्स सेवन हा एक पर्याय असल्याचं वक्तव्य देखील त्याने केलं. बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार हे कोकीनच्या आहारी गेले असल्याचा दावा देखील त्याने केला. 

१९७०च्या दशकापासून ड्रगचा ट्रेंड
युवराजच्या म्हणण्यानुसार 'बॉलिवूडमध्ये १९७०च्या दशकापासून ड्रग्सचा बोलबाला आहे. परंतु त्याकाळी सोशल मीडियाचा अधिक प्रभाव नसल्यामुळे अनेक गोष्टी समोर येत नव्हत्या. मात्र आता कलाविश्वातील अधिक लोक कोकीनचं सेवन करतात हे समोर येत आहे. '

कॅमेरापर्सनपासून ते तंत्रज्ञ लोकांपर्यंत सर्व जण ड्रग्सचं सेवन करतात.
'वीड सिरगेट प्रमाणे असतं. खासकरून कॅमेरापर्सन आणि तंत्रज्ञ वीडचं सेवन करतात. तर बॉलिवूड पार्ट्यांमध्ये कोकीन सर्वांत मुख्य स्थानी आहे. या शिवाय एमडीएमए हा देखील ड्रग्सचाच प्रकार आहे. त्याला एलएसडी किंवा ऍसिड देखील म्हटल जातं. या ड्रग्सचा  प्रभाव १५ ते २० तासांपर्यंत असतो.' असं वक्तव्य युवराजने केलं. 

बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी उत्तम पर्याय ड्रग्स असल्याचं देखील त्याने सांगितलं. 'बॉलिवूडमध्ये अनेक लोक ड्रग्सचं सेवन करतात. अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शक एकत्र ड्रग्स पार्टी करतात. त्यानंतर ते त्याच गटांमध्ये काम करतात. सध्या इंडस्ट्रीमध्ये अशी मानसिकता काम करत असल्याचा खुलासा युवराजने केला.