VIDEO : मल्हारी गाण्यावर भाऊचा अफलातून डान्स

पाहा हा व्हिडिओ 

Updated: Dec 22, 2018, 12:32 PM IST
VIDEO : मल्हारी गाण्यावर भाऊचा अफलातून डान्स  title=

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या मंचावर रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा'या सिनेमाची टीम आली आहे. सिम्बा या सिनेमातून रणवीर सिंह आणि सारा अली खान प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या सोमवारी ही टीम आपल्याला भेटणार आहे. 

आतापर्यंत चला हवा येऊ द्याच्या मंचावर आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले आहेत. बॉलिवूडकरांना आकर्षित करण्यात हवा येऊ द्याची टीम यशस्वी ठरली आहे. 

रणवीर सिंह आपल्या प्रत्येक सिनेमामुळे आणि डान्समुळे कायमच चर्चेत राहिला आहे. रणवीर सिंहच्या 'बाजीरावर मस्तानी' सिनेमातील 'मल्हारी' हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे. 

या गाण्यावर चला हवा येऊ द्यामध्ये भाऊ कदमने चक्क 'मल्हारी' या गाण्यावर डान्स केला. या गाण्यावरचा भाऊचा डान्स बघून रणवीर सिंह देखील थक्क झाला. 

भाऊला हा डान्स आपण कुठे शिकलात? हा प्रश्न विचारला. त्यावर भाऊचं उत्तर ऐकून रणवीर सिंह, रोहित शेट्टी आणि सिम्बाची संपूर्ण टीम आश्चर्यचकित झाली. आणि हास्याचा एकच कल्लोळ फुटला. 

तसेच रणवीर सिंहने या एपिसोडमध्ये धुमाकूळ घातला आहे. आँखे मारे या गाण्यावर रणवीर सिंहने डान्स करून धुमाकूळ घातला आहे. थुकरटवाडीतील हा डान्स रणवीर आणि चला हवा येऊ द्याच्या चाहत्यांना नक्कीच भावणार आहे. 

सोशल मीडियावर झी मराठीने अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यातील सगळे व्हिडिओ प्रेक्षकांना पसंत पडत आहेत. या एपिसोडचे अनेक व्हिडिओ जगासमोर येत आहे.